गोविंदा हा एक लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने 90 च्या काळात अनेक चित्रपटात काम केले आहेत. आणि याच दरम्यान गोविंदा आणि दिग्दर्शक डेव्हिड धवन यांची जोडी प्रसिध्द होती. या दोघानी मिळुन 17 चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. त्यातील अनेक चित्रपट हिट ठरले मात्र 17 चित्रपटांनंतर त्याचे मार्ग वेगळे झाले. आणि याबाबत अनेक दिवसांपासुन अनेक तर्क लावले जात होते. मात्र एवढ्या काळाने गोविंदाने या गोष्टीवर उत्तर दिले आहे.
गोविंदाच्या म्हणण्यानुसार, डेव्हिड धवन यांना एकत्र आणखी चित्रपट करायचे होते, पण त्यांना वाटले की डेव्हिड अशा टप्प्यावर पोहोचले आहेत जिथे त्यांनी एकत्र काम करणे आता योग्य नाही. त्याने एका मुलाखती दरम्यान दिग्दर्शकाचे कौतुक करत म्हणले की ते गॅाड बेबी आहेत. जेव्हा त्यांना वाटले की आता गोविंदासोबत काम करणे शक्य नाही, तेव्हा त्यांनी काम थांबवले.” मला वाटत होते की आम्ही 18वा आणि 19वा चित्रपट एकत्र करावा, पण ते शक्य झाले नाही. त्याच्या या निर्णयानंतर मला वाटले की तो त्याच्या स्वत:च्या विचारांनुसार वागत आहेत. मला त्याबाबत काहीच शंका नाही. आणि मला त्याचा कधी राग ही नाही आला. ते मला फोन करत असतात. आज हि ते फोन केले की माझ्यापाशी रडतात. तो एक माणुस म्हणुन खुप चांगला आहे.
गोविंदाच्या (govinda)कामाबाबत बोलायचे तर तो बऱ्याच वर्षापासुन चित्रपटापासुन दुर आहे. मात्र तो लवकरच एक चित्रपटात दिसणार आहे. आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील काही कारणामुळे चर्चेत आहे. त्याची पत्नी सुनीता आहुजा हिने त्याच्यावर विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केला आहे. तर नुकतेच तो अभिनेत्री कोमल राणी सोबत विमातळावर दिसला होता. मात्र एका मुलाखती दरम्यान सुनीताने कोमल या नावाचा उल्लेख करत म्हणले होते हे नाव तिला अजिबात अवडत नाही.
हेही वाचा
सर्जरी सुरू असतानाही सोनू निगमने डॉक्टरांच्या टिमसाठी गायले मोहम्मद रफींचे गीत










