आकांक्षा चमोला हि एक अभिनेत्री आहे. आणि ती नुकत्याच पार पडलेल्या नेटफ्लिक्सच्या ‘लॉक अप 2’ या रिॲलिटी शो मुळे चर्चेत आली होती तीने या शो दरम्यान तिच्या बाबतचे अनेक धक्कादायक किस्से शेअर केले आहेत. तिने सांगितले की ती आणि गौरव खन्ना जवळपास एक वर्षापासुन विभक्त झाले आहेत. आता शो संपल्यानंतर तीला त्याच्या नावा पासुन गौरव खन्नाचे नाव वेगळे करायचे आहे. आणि आता तिने सोशल मीडीयावर तिचे युझरनेम बदलण्यासाठी तिने मेटा इंडियाकडे “तात्काळ मदतीची” विनंती केली आहे.
आकांक्षा हि विनंती जरी केली असली तरी सध्या गौरव खन्नाचे युझरनेम आहे. शुक्रवारी, आकांक्षाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर मेटा इंडियाला टॅग केले होते. तिने या मध्ये असेही म्हणले होती की ती अनेक वेळा नाव बदलण्याचा प्रयत्न करुनही ती बदलु शकली नाही.
अभिनेत्री आकांक्षा चमोलाने तिचे इंस्टा युझरनेम बदलण्यासाठी मेटा इंडियाची मदत मागितली आहे. तर इंस्टाची मुळ कंपनी मेटाला एक अधिकृत पत्रही लिहले आहे. आकांक्षाने मेटा ला टॅग केले आहे. आणि तातडीने मदत मागितली आहे.
तसेच ‘लॉक अप 2’ च्या एका एपिसोडमध्ये, गौरव खन्नाने आकांक्षाला भेट दिली होती. संभाषणादरम्यान, त्यांनी त्यांच्या घटस्फोटावर चर्चा केली होती. मात्र गौरवने स्पष्ट केले की अद्याप काहीही अधिकृत झालेले नाही. पण आकांक्षा तिच्या निर्णयावर ठाम असल्याचे दिसत आहे. मात्र या बाबतच्या घटनामुळे दोघाचेही चाहते चिंतेत आहेत.
हेही वाचा
या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सनी देओल लखनऊत, मुख्यमंत्री योगींची घेतली भेट










