Saturday, September 26, 2026
Home › बॉलीवूड › टॅाक्सिकच्या ट्रेलरमध्ये पत्नी कियारच्या अभिनयावर फिदा सिद्धार्थ, मोठ्या पडद्यावर चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक

टॅाक्सिकच्या ट्रेलरमध्ये पत्नी कियारच्या अभिनयावर फिदा सिद्धार्थ, मोठ्या पडद्यावर चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक

यश अभिनीत आगामी ‘टॉक्सिक: अ फेअरिटेल फॉर ग्रोन-अप्स’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. आणि तो अगदी सोशल मिडीयावर चर्चेचा विषय बनला आहे. त्याला अनेक चाहते पंसत करत आहेत, तर यामध्ये यश एका दमदार ऍक्शन लुक मध्ये दिसत आहे. तर या चित्रपटात यश दोन भुमिकांमध्ये दिसणार आहे. तसेच यात कियारा अडवणीसुध्दा लक्ष वेधुन घेत आहे. नुकतेच  ‘टॉक्सिक’मधील ‘तबाही’ हे पहिले गाणे प्रदर्शित झाले, ज्यामध्ये कियारा आणि यश यांची जबरदस्त केमिस्ट्री दिसून आली. पण काही प्रेक्षक तिला या गाण्यातील बोल्ड लुक मुळे ट्रोल करत आहेत. याच दरम्यान मात्र कियाराचा पती सिध्दार्थ मल्होत्राकडुन पाठिंबा मिळाला आहे. तिचे त्याने कौतुक केले आहे. 

अभिनेता सिध्दार्थने त्याच्या इंस्टा स्टोरीवर टॉक्सिक: अ फेअरिटेल फॉर ग्रोन-अप्सचा ट्रेलर शेअर करत कियारा (kiyara)अडवाणीच्या अभिनयाचे कौतुक केले आहे. तसेच तिचा अतापर्यतचा सर्वात उत्तम अभिनय असे म्हणले आहे. आपल्या पोस्टमध्ये त्याने कियारा आणि पुर्ण टिमचे कौतुक केली आहे. त्याने लिहले आहे, की, कठोर परिश्रम, समर्पण आणि आवड हे सगळं मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. गीतू मोहनदास आणि यश, तुम्ही आणि संपूर्ण टीमने जी जादू निर्माण केली आहे, त्यामुळे हा चित्रपट पाहण्यासाठी मी अजुन थांबवु शकत नाही. ‘टॉक्सिक’ टीमला खूप खूप शुभेच्छा.

टॉक्सिक: अ फेअरिटेल फॉर ग्रोन-अप्स हा चित्रपट 26 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहामध्ये रिलीज होणार आहे. हा एक बहुप्रतिक्षत चित्रपट आहे. यात यश, अडवाणी, नयनतारा, हुमा कुरेशी, तारा सुतारिया आणि रुक्मिणी वसंत या कलाकांरानी यात मुख्य भुमिका साकारली आहे.

सर्जरी सुरू असतानाही सोनू निगमने डॉक्टरांच्या टिमसाठी गायले मोहम्मद रफींचे गीत

हे देखील वाचा