कंगनाची बहीण रंगोलीने तापसीवर निशाणा साधणारी पोस्ट केली डिलिट; पुन्हा नवीन पोस्टसह उडवली तिची खिल्ली


कंगना रणौत आणि तिची बहीण रंगोली चंदेल नेहमी या ना त्या कारणावरून चर्चेत असतात. दोघी बहिणी ‘पंगा’ घेण्यासाठी ओळखल्या जातात. बॉलिवूडची क्वीन असणारी कंगना रणौत नेहमी विवादित व्यक्तव्यांमुळे चर्चेचा विषय बनते. कंगना सारखीच तिची बहीण रंगोली देखील कलाकारांवर निशाणा साधण्यासाठीच ओळखली जाते. सध्या तापसी पन्नूचा रशिया ट्रीपवर असतानाच एक फोटो खूप व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये तापसीने मोतिया रंगाची साडी आणि त्यावर निळ्या रंगाचे ब्लाउज घातले आहे. तापसीचा हा फोटो नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे.

मात्र कंगनाची बहीण रंगोलीने तापसीच्या या हटके लूकवर निशाणा साधत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. रंगोलीने तापसीचा फोटो शेअर करत लिहिले, “ही कंगनाच्या मुलाखती, लुक्स, स्टाइल म्हणजेच एकंदरित कंगनाची कॉपी करते. पुन्हा एकदा तिने कंगनाच्या साडी लुकला कॉपी केले आहे. मी जेव्हा तापसीचा हा लूक पाहिला तेव्हा मला खूप आश्चर्य वाटले. ठीक आहे, मात्र असे तरी नको बोलू की तू साडीचा लूक कुल केला आहेस. असे बोलून तू वाचू शकत नाहीस.”

या पोस्टला रंगोलीने काही वेळाने डिलिट केले आणि पुन्हा एक नवीन पोस्ट शेअर केली. यात तिने म्हटले की, “हा लूक कुल नाही तर क्रिपी फॅनसारखा वाटतो आहे. फक्त मुलाखती, लूक आणि स्टाइल नका कॉपी करू तर संपूर्ण काम करण्याची पद्धतच कॉपी करा.”

यानंतर रंगोलीने पुन्हा कंगनाने साडी नेसलेला फोटो शेअर केला. यात तिने लिहिले, “कंगना सर्वांसाठी एक स्टाइल आयकॉन आहे. माझ्या बहिणीने नेहमीच स्त्रियांना साडी नेण्यासाठी प्रेरित केले असून सोबतच आपल्या हॅन्डलूम क्षेत्राला देखील सुगीचे दिवस आणण्याचा तिचा प्रयत्न आहे.”

कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले, तर तिच्या ‘थलाइवी’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून चित्रपटही लवकरच प्रदर्शित होईल. याशिवाय ती ‘तेजस’ आणि ‘धाकड’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. तर तापसी पन्नूबद्दल सांगायचे झाले, तर तापसीचा लवकरच ‘हसीन दिलरुबा’ सिनेमा प्रदर्शित होणार असून, सोबतच ती ‘रश्मि रॉकेट’, ‘शाबाश मिठु’, ‘लूप लपेटा’, ‘दोबारा’ आणि ‘वो लड़की है कहां’ सिनेमांमध्ये दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘…नैणा ठग लेंगे’, म्हणत प्रार्थना बेहेरेच्या नजरेने केला चाहत्यांच्या हृदयावर वार; ग्लॅमरस फोटो होतायेत व्हायरल

-नववारी साडीमध्ये खुललं अपूर्वा नेमळेकरचं सौंदर्य; तर कॅप्शननेही वेधलं अनेकांचं लक्ष

-स्पृहा जोशीचे लाजने पाहून चुकला चाहत्यांच्या काळजाचा ठोका; व्हिडिओवर पडतोय लाईक्सचा पाऊस


Leave A Reply

Your email address will not be published.