Wednesday, June 26, 2024

‘सिंघम अगेन’च्या सेटवरून फोटो लीक! रणवीर सिंगचा ‘तो’ फोटो पाहून चाहते खल्लास

बॉलीवूडचा उत्तम अभिनेता मानल्या जाणाऱ्या रणवीर सिंगने प्रत्येक चित्रपटात आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. त्याची अष्टपैलू कामगिरी चाहत्यांना आवडते. 2022 हे वर्ष रणवीरसाठी काही खास नव्हते, पण 2023 मध्ये त्याने ‘रॉकी रंधवा’ बनून पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर आपले वर्चस्व निर्माण केले आहे. आता रणवीर रोहित शेट्टीच्या ‘सिंघम अगेन’ या चित्रपटातून पुन्हा एकदा लोकांचे मनोरंजन करणार आहे. त्याचा सेटवरील पहिला फोटो समोर आला आहे.

‘सिंघम अगेन’हा 2011 मध्ये आलेल्या सिंघम चित्रपटाचा दुसरा भाग आहे. या चित्रपटात अजय देवगण मुख्य भूमिकेत होता. सिंघम अगेनमध्ये रणवीर सिंह व्यतिरिक्त अजय देवगण आणि काजोल देखील महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहेत. सध्या या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी रोहित शेट्टीने अजय देवगण आणि रणवीर सिंगसोबत सेटवरील एक फोटो शेअर केला होता.

चित्रपटाचे शूटिंग सुरू झाल्याची बातमी आहे. रणवीर सिंहने सेटवरील एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो सिम्बा लूकमध्ये दिसत आहे. रणवीरने हा फोटो त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर शेअर केला आहे. फोटोमध्ये रणवीरने काळ्या रंगाचा बनियान आणि चष्मा घातलेला दिसत आहे. सिंघम शीर्षक गीत आणि सिम्बा स्टिकरसह फोटो पोस्ट केले गेले आहे. पार्श्वभूमीवर ‘आला रे आला’ संगीत वाजत आहे. इतकंच नाही तर तो मिशीला खेचतानाही दिसत आहे.

‘सिंघम अगेन’ची तारीख अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाही, मात्र पुढील वर्षी 15 ऑगस्टला हा सिनेमा रिलीज होणार असल्याची चर्चा आहे. असे झाल्यास त्याला अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2’ कडून कडवी स्पर्धा होईल. रणवीरचा हा फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरत आहे. चाहते सोशल मीडियावर रणवीरच्या या लूकचे कौतुक करत आहेत. (Ranveer Singh photos from the sets of Singham Again go viral)

आधिक वाचा-
भयंकर! ‘या’ कन्नड अभिनेत्याने जोडप्याच्या अंगावर घातली भरधाव कार; महिलेचा मृत्यू
‘प्रेमात पडलो…’ किरण मानेंची पोस्ट चर्चेत; चाहते म्हणाले, ’52 वर्षाचा तरुण वाघ…’

हे देखील वाचा