Tuesday, December 24, 2024
[aioseo_breadcrumbs]

टीम इंडियाच्या विश्वविजयावर आधारित ‘८३’ सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख ठरली; रणवीर-दिपीका आहेत मुख्य भूमिकेत

नवीन वर्ष सुरु झाले आणि कोरोनाचे गडद संकट हळू हळू निवळायला लागले. मागच्या वर्षी कोरोनाच्या महामारीमुळे झालेल्या लॉकडाउनच्या काळात अनेक मोठ्या सिनेमा रिलीज होऊ शकले नव्हते. मात्र जसे कोरोनाचे संकट कमी झाले, तसे अनलॉक सुरु झाले. सुरुवातीला फक्त ५० टक्के क्षमतेने सुरु झालेले चित्रपटगृह आता १०० टक्के क्षमतेने सुरु झाले आहेत. ही बातमी सर्वांसाठीच दिलासादायक ठरली आहे. याचमुळे आता अनेक चित्रपटांच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा होणार आहे.

रणवीर सिंगचा बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित असलेला सिनेमा म्हणजे ‘८३’. हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होण्याच्या मागार्वर आहे. १० एप्रिल २०२० ला प्रदर्शित होणार हा सिनेमा आता २५ जून २०२१ ला प्रदर्शित होऊ शकतो. बॉलिवुड हंगामाच्या रिपोर्टनुसार कबीर खान दिग्दर्शित ‘८३’ हा सिनेमा येत्या जून महिन्यात प्रदर्शित होत आहे. २ एप्रिलला अक्षय कुमार, कतरीना कैफचा ‘सूर्यवंशी’ प्रदर्शित होत आहे. शिवाय १२ एप्रिलपासून रमजान सुरु होत असून या महिन्यात सलमान खानचा ‘राधे’ आणि जॉन अब्राहमचा ‘सत्यमेव जयते २’ सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

त्यामुळेच ‘८३’ हा सिनेमा जूनमध्ये प्रदर्शित होईल. हा सिनेमा ह्यावर्षीच्या सुपरहिट सिनेमांच्या यादीत गणला जाणार हे नक्की. चित्रपटाच्या घोषणेपासूनच प्रेक्षकांमध्ये सिनेमाबद्दल प्रचंड उत्कंठा आहे. १९८३ साली भारताने जो क्रिकेटचा वर्ल्डकप जिंकला होता त्यावर आधारित हा सिनेमा असणार आहे.

या सिनेमात रणवीर सिंग कपिल देवची भूमिका साकारणार आहे, तर दीपिका पदुकोण कपिल देव यांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. या दोघांच्या लग्नानंतर पहिल्यांदाच हे एकाच सिनेमात काम करताना दिसणार आहे. त्यामुळे या दोघांच्या सर्व फॅन्सला हा सिनेमा कधी प्रदर्शित होतो याची खूपच जास्त उत्सुकता आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही वाचा-

‘भाऊ, तेवढंच काम राहिलंय आता…’, सोनू सूदकडे चाहत्याने केली अशी तक्रार की अभिनेत्याने तिथेच जोडले हात
द लेजेंड हनुमान  सिरीजचा ट्रेलर प्रदर्शित, जाणून घ्या कोणता रोल निभावतो मराठमोळा शरद केळकर?
तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरतंय स्पेलंडर  गाणं, रिलीज झाल्यापासून चार दिवसांत मिळालेत लाखो हिट्स
गुरु रंधावाच्या या गाण्याचा मेकिंग व्हिडिओ सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ; हिट्स लाखोंच्या घरात
प्रीती झिंटाच्या  बुमरो बुमरो  गाण्यावर काश्मिरमध्येच थिरकली शहनाज गिल, व्हिडीओने सोशल मीडियावर मिळविल्या लाखो हिट्स

हे देखील वाचा