[rank_math_breadcrumb]

ॲडव्हान्स बुकिंगमध्ये धुरंधर2 ची झेप, रणवीर सिंगच्या चित्रपटाने रिलीजपूर्वीच मारली सेंचुरी

धुरंदर हा चित्रपट 2025 मधील सर्वात सुपर हिट ठरलेला चित्रपट आहे. तर याचा दुसरा भाग ही लवकरच प्रदर्शित होतात आहे. तर या चित्रपटाला रिलीज पूर्वेच उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. कारण ॲडव्हान्स बुकिंग मधून प्रचंड कमाई झाली आहे. तर याचे दिग्दर्शक आदित्य धर हे आहे. आदित्य सर यांनी उरी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. दोन्हीही चित्रपट बॉक्स ऑफिसवर उत्तम ठरले. “धुरंधर: द रिव्हेंज” हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या तीन दिवस आधीच नवीन विक्रम प्रस्थापित करत आहे. एडव्हान्स बुकिंगमुळे तिकीट खिडकीवर प्रंचड विक्री होत आहे. 

“धुरंधर 2” 19 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. तर 18 मार्चच्या संध्याकाळी पेड प्रिव्ह्यू शो सुरू होतील. प्रिव्ह्यू शोमध्ये तब्बल 32.44 कोटी  कमाई केली आहे, ज्यामुळे भारतीय चित्रपटाच्या सर्वात मोठ्या प्रीमियरचा विक्रम प्रस्थापित झाला आहे. ज्यामुळे भारतीय चित्रपटाच्या सर्वात मोठ्या प्रीमियरचा विक्रम प्रस्थापित झाला आहे. तज्ञांचा असा विश्वास आहे की बुधवारपर्यंत हा प्रिव्ह्यू आकडा 40 कोटी  ओलांडू शकतो.

रणवीर (Ranveer)सिंग मुख्य भूमिकेत असुन आर. माधवन, अर्जुन रामपाल, संजय दत्त आणि सारा अर्जुन हे सुध्दा आहे. पहिल्या भागात खलनायक अक्षय खन्नाच्या कॅमिओबद्दल चाहते देखील उत्सुक आहेत. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये प्रदर्शित झालेल्या पहिल्या भागात 1300 कोटींपेक्षा जास्त कमाई झाली आहे आणि अजूनही अनेक चित्रपटगृहांमध्ये सुरू आहे. व्यापार तज्ञांचा असा विश्वास आहे की “धुरंधर 2” जागतिक स्तरावर 2000 कोटींचा टप्पा ओलांडू शकेल.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

 

हेही वाचा 

गरिबीवर मात करण्यासाठी गाठलं IIT बॉम्बे, पण गणिताचे फॉर्म्युला नाही पटले, तर आज बनला OTT स्टार