Thursday, July 18, 2024

वाढदिवसाच्या खास निमित्तावर रश्मिकाच्या सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीझ, हिजाबमध्ये दिसली अभिनेत्री

अगदी लहान वयातच नॅशनल क्रश बनलेली दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) हिने देशभरातील चाहत्यांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. ‘पुष्पा’ या ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या यशानंतर रश्मिकाची लोकप्रियता खूप वाढली आहे. ही अभिनेत्री आज तिचा २६वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास प्रसंगी तिचे चाहते आणि मित्र रश्मिकाचे अभिनंदन करत आहेत. यानिमित्त श्री वेंकटेश्वर क्रिएशननेही रश्मिकाचे अभिनंदन करणारे ट्वीट केले आहे.
आपल्या या पोस्टमध्ये श्री वेंकटेश्वर क्रिएशनने लिहिले, “प्रतिभावान आणि सुंदर रश्मिका मंदान्ना हिला वाढदिवसाच्या शुभेच्छा. #Thalapathy66 मध्ये आपले स्वागत आहे.” रश्मिका मंदान्ना थलपथी विजयच्या आगामी ‘थलपथी ६६’ या चित्रपटात दिसणार आहे. थलपथी विजयचा हा ६६वा चित्रपट आहे, ज्यामध्ये रश्मिका मुख्य भूमिकेत दिसणार आहे. दोघांच्या या चित्रपटाबद्दल चाहतेही खूप उत्सुक आहेत. (rashmika mandanna new look released on her birthday as afreen in next film)
रश्मिका मंदान्नाच्या वाढदिवसानिमित्त तिच्या आगामी चित्रपटाचे मोशन पोस्टरही लाँच करण्यात आले आहे. मात्र चित्रपटाच्या नावाचा खुलासा अद्याप करण्यात आलेला नाही. या चित्रपटात रश्मिकासोबत दुलकर सलमान देखील दिसणार आहे. या चित्रपटात रश्मिका आफरीनची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट हनु राघवपुडी यांनी दिग्दर्शित केला आहे.
या चित्रपटाच्या फर्स्ट लूक मोशन पोस्टरमध्ये रश्मिकाने हिजाब घातला आहे. याशिवाय तिने डेनिम, मल्टीकलर स्वेटर आणि कॉम्बॅट शूज घातले आहेत. पोस्टरमध्ये ती दंगलग्रस्त भागातून एका जळत्या कारला पार करताना दिसत आहे. तिचा पहिला लूक शेअर करताना, वैजंती मूव्हीजने लिहिले, “आमच्या बाघी आफरीनला भेटा…हॅपी बर्थडे रश्मिका.” रश्मिकाच्या फर्स्ट लूकनंतर चाहत्यांमध्ये या चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे. 

हे देखील वाचा