Monday, April 20, 2026
Home बॉलीवूड ‘टाइमलेस ब्यूटी’ रवीना टंडनने शेअर केले तिचे कुल हुडी फोटो, पाहून चाहते म्हणतायेत…

‘टाइमलेस ब्यूटी’ रवीना टंडनने शेअर केले तिचे कुल हुडी फोटो, पाहून चाहते म्हणतायेत…

बॉलिवूडवर ९० च्या दशकात वर्चस्व गाजवणाऱ्या अभिनेत्रींमध्ये पहिले नाव अभिनेत्री रवीना टंडनचे आहे. रवीना एक अशी अभिनेत्री आहे जिने बॉलिवूडच्या शाहरुख खान, आमिर खान आणि सलमान खान या तिघांसोबत काम केले आहे आणि हिट चित्रपट देखील दिले आहेत. रवीना टंडनची गोविंदासोबतची जोडी सर्वाधिक आवडली आहे. या दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. मागील काही वर्षांपासून रवीना टंडन चित्रपटांपासून दूर असली, तरी तिची लोकप्रियता कसलीच कमी झालेली नाही. अलीकडेच रवीना टंडनने तिचे फोटो इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत, जे पाहून चाहते तिच्या फोटोंवर एकापेक्षा एक प्रतिक्रिया देत आहेत.

रवीना टंडनने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून फोटो शेअर केले आहेत. रवीनाचे वेगवेगळे मूड आणि स्टाईल या फोटोंमध्ये दिसत आहेत. रवीनाने या फोटोंमध्ये बेज रंगाचे हुडी जॅकेट घातले आहे. मोकळे केस आणि हलका न्यूड मेकअप रवीनाच्या सौंदर्यात भर घालत आहे. या फोटोंमध्ये सर्वात सुंदर आणि आकर्षक ठरत आहे तिचे डोळे. रवीना टंडनचे तिच्या चेहऱ्यावरील विविध एक्सप्रेशन बघणाऱ्याला घायाळ करत आहेत. तिचा हा हुडीवाला हॉट आणि लक्षवेधी लूक सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

रवीना टंडनने शेअर केलेल्या फोटोंना कॅप्शन देताना तिने लिहिले, “जेव्हा तुम्ही तुमच्या रूममध्ये तुमची आवडती गोष्ट घालून बसतात” तिच्या या कुल फोटोवर अनेकांनी ‘टाइमलेस ब्यूटी’ लिहीत अनेकांनी तिची स्तुती केली आहे. बॉलिवूडसोबत साऊथ इंडस्ट्रीदेखील गाजवणारी रवीना अनेकदा टेलिव्हिजनवरील वेगवगेळ्या कार्यक्रमांमध्ये हजेरी लावताना दिसते. नुकतीच रवीना आपल्याला टेलिव्हिजनवरील ‘सुपर डान्सर ४’ मध्ये हजेरी लावत खूप धमाल मस्ती केली. यावेळी रवीनाने शिल्पाच्या ‘चुरा के दिल मेरा’ या गाण्यावर दमदार डान्स देखील केला होता.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अक्षय कुमारसोबत केले होते पदार्पण; मात्र सुंदरतेने वेड लावलेली शांतीप्रिया आज का राहतेय बॉलिवूडपासून दूर?

-सिद्धार्थ शुक्लाच्या कुटूंबाकडून जारी करण्यात आले निवेदन; मुंबई पोलिसांचे आभार मानत, लोकांना केली ‘ही’ विनंती

-हर्षवर्धन राणेनंतर ‘या’ प्रसिद्ध खेळाडूसोबत नात्यात आहे किम शर्मा; स्वत: केला खुलासा

हे देखील वाचा