Tuesday, March 19, 2024

कालीन भैय्याचा नादच नाही, वाचा पंकज त्रिपाठी सोबत घडलेला हा किस्सा

२०१८ मध्ये, अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओने ‘मिर्जापूर’ सह वेब-सिरीज विश्वात पाऊल ठेवले. चाहत्यांनी एवढी डोक्यावर घेतलेल्या अगदी मोजक्या वेब-सिरीज मध्ये याचा समावेश होतो यात काही शंका नाही. चाहत्यांनी केवळ याचा आनंदच न घेता पुढच्या भागाची मागणी करायला लगेचच सुरवात केली.

मिर्झापूर मधील सर्वात चर्चित पात्र म्हणजे कालीन भैय्या. कालीन भैईयाची भूमिका साकारणारे पंकज त्रिपाठी यांनी एक रंजक किस्सा शेअर केला त्यात ते म्हणले की, “मी यूकेच्या ग्लासगो येथे ‘८३’ चित्रपटाचे चित्रीकरण करत होतो. शूटिंग दरम्यान लोक त्या जागेभोवती जमले आणि मी विचार केला कि कदाचित भारतीय चित्रपटाचे चित्रीकरण सुरु आहे त्यामुळे लोक औत्सुक्याने बघायला जमले असतील,  ती गर्दी फक्त भारतीय चाहत्यांचीच नव्हती तर परदेशी चाहते सुद्धा एकत्र जमले होते आणि जेव्हा मला त्यांना भेटायची संधी मिळायची तेव्हा त्यांचा एकच प्रश्न असायचा  – कालीन भैय्या, तूम्ही पडद्यावर परत कधी दिसणार आहात?”

ते पुढे म्हणाले, “मिर्झापूरची युके मधील एवढी प्रचंड लोकप्रियता पाहून मी अक्षरशः थक्क झालो. मी इतर चित्रीकरणासाठी सुद्धा काम करताना सेट वर अनेक लोक मिर्झापूरबद्दल किती वेडे आहेत हे जाणवते.”

मला असे वाटते की ‘मिर्जापूर’ची जादू प्रेक्षकांवर इतकी होती की त्यांनी कधीच त्याच्या पुढच्या भागाची मागणी सोडली नाही. अॅमेझॉन प्राईम व्हिडिओचे सोशल मीडिया अकाउंट आणि सर्व कलाकार आणि त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर फक्त एका प्रश्नाचा भडिमार असायचा की दुसरा भाग कधी येणार आहे?

मिर्झापूरचा दुसरा भाग २३ ऑक्टोबर २०२० रोजी प्राईम व्हिडिओ वर प्रदर्शित होणार आहे. मिर्झापूरची पहिल्या दिवसापासूनच प्रचंड हवा हवा होती, पहिल्या भागाने लोकांना वेड लावत एक मोठा ब्रॅण्ड म्हणून समोर आला. दुसऱ्या भागाची घोषणा होईपर्यंत लोकांची उत्सुकता शिगेला गेली होती. चाहत्यांनी मिम्स, किस्से अश्या अनेक प्रकारातून मिर्झापूरची लोकप्रियता गेली दोन वर्ष टिकवून ठेवली आहे.

 

हे देखील वाचा