Monday, July 1, 2024

आयुष्यातील पहिल्या शूटिंगवेळी रेखासोबत घडले असे काही की, ऐन शूटिंगमध्ये रडायला लागली अभिनेत्री

चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये रेखाच्या नावाचा समावेश होतो. रेखा तिच्या चित्रपटांमुळेच नाही तर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. आज आम्‍ही तुम्‍हाला रेखाच्‍या (Rekha) आयुष्‍याशी संबंधित एक किस्‍सा सांगणार आहोत, जो एकेकाळी खूप चर्चेत आला होता. पण चुकीच्‍या कारणांमुळे. रेखाने लहानपणापासूनच चित्रपटात काम करायला सुरुवात केली होती. रेखाच्या आई-वडिलांचे एकमेकांशी चांगले जमत नव्हते, असे म्हटले जाते. रेखा लहान असताना तिचे वडील तिला आणि आईला सोडून गेले.

अशा परिस्थितीत घर चालवण्यासाठी रेखाला इच्छा नसतानाही चित्रपटात काम करावे लागले. मात्र, गोष्ट अशी आहे की, रेखाने 1969 साली ‘अंजाना सफर’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात रेखाच्या विरुद्ध विश्वजीत नायक होता.

माध्यमातील वृत्तानुसार, चित्रपटाच्या दिग्दर्शक राजा नवाथे आणि अभिनेता विश्वजीतने किसिंग सीनची योजना आखली होती. रेखाला चित्रपटात रोमँटिक सीन आहेत हे माहित होते पण किसिंग सीन होणार आहे याची तिला कल्पना नव्हती असे म्हटले जाते.

शूटिंग सुरू होताच विश्वजीतने रेखाच्या मिठीत घेत किस करण्यास सुरुवात केली, तिथे अचानक झालेल्या या घटनेने रेखा स्तब्ध झाली, युनिटमधील लोकांनी शिट्ट्या वाजवायला सुरुवात केली. पूर्ण 20 मिनिटे उलटूनही दिग्दर्शकाने कट न सांगितल्याने हद्द झाली. मात्र, या घटनेनंतर रेखाच्या डोळ्यात अश्रू तरळले असतानाच विश्वजीतने दिग्दर्शकाने जे करायला सांगितले तेच केले, असे सांगून संपूर्ण प्रकरणावर पडदा टाकला. अशाप्रकारे त्यांना काहीही कल्पना नसताना त्यांनी तो सीन शूट केला होता. परंतू त्यानंतर त्यांनी अशा अनेक धाटनीच्या भुमिका निभावल्या ज्यासाठी त्यांचे कौतुक देखील झाले आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
डिमांड तर बघा! रकुल प्रीत सिंगला करायचे आहे रोमँटिक सिनेमात काम, शाहरुख खानला मानते आदर्श

वाढदिवसाचे औचित्य साधून रकुलप्रीत सिंगने केला ‘या’ निर्मात्यासोबत असलेल्या नात्याचा खुलासा

हे देखील वाचा