Saturday, July 27, 2024

बापरे! तब्बल 9 वर्षात दिला नाही एकही हिट सिनेमा, तरीही रिया आहे ‘इतक्या’ कोटींची मालकीण

काही कलाकार असे असतात, ज्यांना त्यांच्या चित्रपटांपेक्षा त्यांच्या कामापेक्षा अधिक प्रसिद्धी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील चांगल्या- वाईट घटनांमुळे मिळत असते. चित्रपटांमध्ये एक गुमनाम चेहरा असलेले हे कलाकार त्यांच्या खऱ्या आयुष्यातील कारनाम्यांमुळे चर्चेत येतात. असाच एक चेहरा म्हणजे रिया चक्रवर्ती. अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर अचानक रिया प्रकाशझोतात आली. सुशांतच्या मृत्यूनंतर रियावर अनेक आरोप झाले. सोशल मीडियावरही रिया तुफान ट्रोल झाली. फ्लॉप अभिनेत्री असलेली रिया अचानक या घटनेमुळे चर्चेत आली. शनिवारी (1 जुलै) रिया तिचा 30 वा वाढदिवस साजरा करत आहे. जाणून घेऊया तिच्याबद्दल काही महत्वाच्या गोष्टी. चला तर मग सुरुवात करूया…

रियाचा जन्म 1 जुलै, 1992 रोजी बंगळुरूमध्ये एका बंगाली कुटुंबात झाला. रियाचे वडील आर्मी ऑफिसर असल्याने तिचे शिक्षण आर्मी शाळेत झाले. शिक्षणानंतर 2009साली रियाने एमटीवी इंडियाच्या टीव्हीएस स्कूटी टीन दिवा स्पर्धेत भाग घेतला. या स्पर्धेत तिला तिसरे स्थान मिळाले. पुढे रियाने दिल्लीमध्ये व्हिडिओ जॉकीसाठी ऑडिशन दिले. इथे तिला तिच्या प्रतिभेच्या जोरावर निवडण्यात आले. रियात असलेले सूत्रसंचालनाचे टॅलेंट ओळखून तिला पेप्सी एमटीव्ही वास्सप, टिक-टॉक कॉलेज बीट आणि एमटीव्ही गोन इन 60 सेकंड अशा शोमध्ये सूत्रसंचालनाची जबाबदारी दिली गेली.

हेच करत असताना रिया अभिनयाकडे वळली, आणि तिने तेलुगू सिनेमा ‘तुनेगा तुनेगा’ मधून चित्रपटामध्ये पदार्पण केले. पुढे तिने तिचा मोर्चा हिंदी चित्रपटांकडे वळवला. ‘मेरे डॅड की मारुती’ या सिनेमातून तिने हिंदी चित्रपटांमध्ये पदार्पण केले. मात्र, या सिनेमाचा तिच्या करिअरसाठी काही फायदा झाला नाही. पुढे ती 2014 साली अली फजलसोबत ‘सोनाली केबल’ सिनेमात दिसली. मात्र, हा सिनेमा देखील फ्लॉप गेला. या सिनेमातील गाणी खूप गाजली आणि रियाला थोडी फार प्रसिद्धी मिळाली. पुढे रिया यशराजच्या ‘बँक चोर’ सिनेमात आणि ‘हाफ गर्लफ्रेंड’ सिनेमात झळकली.

पुढे ती 2018 साली महेश भट्ट यांची निर्मिती असलेल्या ‘जलेबी’ सिनेमात दिसली. या चित्रपटाच्या प्रमोशनवेळी रिया आणि महेश भट्ट यांना अनेकदा जवळ बघितले गेले. त्यांचे असे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल देखील झाले होते. वयात मोठे अंतर असूनही ते रिलेशनमध्ये असण्याच्या अनेक चर्चा रंगल्या. त्यामुळे रिया मोठ्या वादात देखील अडकली होती. महेश भट्ट यांच्या 70 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने रियाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. ज्यात तिने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना लिहिले होते की, “माझे बुद्धा, सर तुम्ही मला प्रेमाने सांभाळले, मला उडायला शिकवले.” या पोस्टनंतर रिया पुन्हा ट्रोल झाली. त्यानंतर तिने पुन्हा एक पोस्ट शेअर करत लिहिले होते, “तू कौन है, तेरा नाम क्या, सीता भी यहाँ बदनाम है.” एका मुलाखतीच्या वेळी रियाने तिच्या आणि महेश भट्ट यांच्या नात्यावर बोलताना सांगितले होत की, ती त्यांना वडिलांप्रमाणे मानते, ते तिचे मेंटॉर आहेत.

रिया चक्रवर्तीचे नाव अनेक लोकांसोबत जोडले गेले. यातीलच एक मुख्य नाव म्हणजे सुशांत सिंग राजपूत. रिया आणि सुशांत रिलेशनशिपमध्ये होते. सुशांत जेव्हा ‘शुद्ध देसी रोमान्स’ या चित्रपटाची शूटिंग करत होता, तेव्हा रिया ‘मेरे डॅड की मारुती’ सिनेमाची शूटिंग करत होती. दोन्ही सिनेमांचे सेट जवळच असल्याने त्यांच्या भेटी व्हायला सुरुवात झाली, तेव्हा सुशांत आधीच एका रिलेशनशिपमध्ये होता. त्यानंतर रिया आणि सुशांतच्या भेटी वाढल्या. आधी मैत्री आणि मग प्रेम असा प्रवास असणाऱ्या या दोघांच्या नात्यात अनेक चढ उतार आले.

जेव्हा सुशांतने 14 जून, 2020ला आत्महत्या केली त्यानंतर सुशांतच्या वडिलांनी रिया आणि तिच्या कुटुंबावर सुशांतला आत्महत्येसाठी प्रेरित करण्याचा आरोप करत तक्रार दाखल केली. त्यानंतर रियाचे संपूर्ण जीवनच बदलले. सतत आरोपांच्या घेऱ्यात असणाऱ्या रियाला ड्रग्ज सेवांसाठी अटक देखील करण्यात आली होती. जवळपास 1 महिन्यानंतर तिला जामीन मिळाला. या ड्रग्ज केसमध्ये रियाचा भाऊ शौविक देखील जेलमध्ये होता. सुशांतच्या परिवाराकडून रियावर मोठे आणि गंभीर स्वरूपाचं आरोप करण्यात आले आहे.

नऊ वर्षाच्या करिअरमध्ये रियाने एकही हिट सिनेमा दिला नाहीये. माध्यमातील वृत्तानुसार, रियाकडे 11 कोटींची संपत्ती आहे. ती महिन्याला 2.5 लाखांपेक्षा अधिक कमावते. वर्षाला रिया 30लाखांपेक्षा जास्त कमावते. रिया आगामी काळात अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मी यांच्या ‘चेहेरे’ सिनेमात झळकणार आहे.

अधिक वाचा- 
– अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर लग्न करणार? अभिनेत्री म्हणाली, ‘मी फक्त…’
‘खुपते तिथे गुप्ते’च्या मंचावर उर्मिला मातोंडकरने केल मोठे भाष्य, म्हणाली, “काही राजकारणी…”

 

हे देखील वाचा