‘कोणाला माहिती होतं की मी…’, म्हणत रिया चक्रवर्तीने शेअर केला तिच्या बालपणीचा फोटो


हिंदी सिनेसृष्टीतील आणि टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या निधनानंतर अभिनेत्री रिया चक्रवर्ती अचानक चर्चेत आली. रियावर सुशांतला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप लावण्यात आला. एकीकडे आपल्या मित्राला गमवण्याचे दुःख आणि दुसरीकडे तिच्यावर लावण्यात आलेले आरोप यामुळे २०२० हे वर्ष तिच्यासाठी खूपच वाईट गेले.

एक महिना तुरुंगात राहून आलेली रिया सोशल मीडियावर खूपच कमी सक्रिय दिसत होती. मात्र १४ जूनला सुशांतसिंग राजपूतला जाऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. रियाने या दिवशी सुशांतला आठवत एक लांबलचक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. सुशांतच्या पहिल्या स्मृतिदिनानंतर काही दिवसांनी पुन्हा रियाने सोशल मीडियावर तिचा एक फोटो आणि सोबत एक सकारात्मक संदेश दिला आहे.

 

रियाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले की, “आणि असेच तिने वादळांचा सामना केला. कारण खरंच नेहमी सकाळ होण्याआधी रात्रच असते.” तिने पोस्ट केलेल्या तिच्या लहानपणाच्या फोटोसोबत लिहिले, “मला वाटते की आई मला चालायला शिकवत होती. मात्र कोणाला माहित होते की, मी उडायला पण शिकेल.”

नुकताच साजरा झालेल्या फादर्स डे निमित्ताने देखील रिया चक्रवर्तीने तिच्या वडिलांना उद्देशून एक पोस्ट शेअर केली होती. रियाने तिच्या या पोस्टमध्ये लिहिले की, “फादर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा बाबा! तुम्ही माझी प्रेरणा आहात. मला माफ करा ती वेळ खूप कठीण होती, पण लहान मुलगी असल्याचा मला अभिमान आहे. माझे स्ट्रॉंग बाबा, लव्ह यू बाबा, मिष्टी” या पोस्टसोबतच रियाने तिच्या बालपणाचा तिच्या वडिलांसोबतचा एक फोटो देखील शेअर केला होता.

सुशांतसोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणाऱ्या रियाने सुशांतच्या मृत्यूच्या काही दिवस आधीच त्याचे घर सोडले होते. रियावर सुशांतच्या बॅंक अकाउंटमधून १५ कोटी रूपये काढल्याचा आरोप करण्यात येतोय. ड्रग्ज प्रकरणात सुद्धा रियाला कित्येक दिवस जेलमध्ये रहावे लागले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘…नैणा ठग लेंगे’, म्हणत प्रार्थना बेहेरेच्या नजरेने केला चाहत्यांच्या हृदयावर वार; ग्लॅमरस फोटो होतायेत व्हायरल

-नववारी साडीमध्ये खुललं अपूर्वा नेमळेकरचं सौंदर्य; तर कॅप्शननेही वेधलं अनेकांचं लक्ष

-स्पृहा जोशीचे लाजने पाहून चुकला चाहत्यांच्या काळजाचा ठोका; व्हिडिओवर पडतोय लाईक्सचा पाऊस


Leave A Reply

Your email address will not be published.