झक्कासच! रिंकू राजगुरूची फिटनेस पाहून चक्रावले चाहते; फोटोमध्ये पाहायला मिळाले आश्चर्यकारक परिवर्तन

rinku rajguru shared her picture right after workout fans gets shocked by her fitness


‘सैराट’मधली आर्ची अर्थातच अभिनेत्री रिंकू राजगुरू सतत कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. तिच्या पोस्ट्स दरदिवशी सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता लॉकडाऊनमध्ये तर रिंकू सोशल मीडियावर अधिकच सक्रिय झाली आहे. रोज नवनवीन फोटो आणि व्हिडिओ शेअर करून, ती नेटकऱ्यांचे लक्ष वेधण्याची एकही संधी सोडत नाही. नुकताच रिंकूने शेअर केलेल्या पोस्टची आता चर्चा रंगू लागली आहे.

तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोत तिने क्रॉप टॉप घातला आहे. तुम्ही पाहू शकता की, तिने व्यायाम केल्यानंतर हे फोटो क्लीक केले आहेत. यामध्ये रिंकू अतिशय फिट दिसत आहेत. तिचे टोन्ड फिगर यात सहजपणे पाहिले जाऊ शकते. रिंकूचे हे परिवर्तन पाहून, सर्वचजण चकित झाले आहेत.

लॉकडाउनमध्ये मिळालेला मोकळा वेळ रिंकूने कारणी लावलेला दिसत आहे. काम वगैरे चालू नसल्याने रिंकू लॉकडाउनमध्ये नियमित व्यायाम करायची. इतरत्र आपला वेळ वाया न घालवता, तिने वेळेचा चांगलाच सदुपयोग केला आहे. पूर्वीची रिंकू आणि आताची रिंकू यामध्ये आता खूप फरक पाहायला मिळत आहे.

रिंकूच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर तिने काही दिवसांपूर्वीच ‘छूमंतर’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. हा आगामी चित्रपट लंडनमध्ये शूट करण्यात आला आहे. या चित्रपटात रिंकू राजगुरू सोबत, प्रार्थना बेहरे, अभिनेता सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेनाही मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर जोशी करत आहेत. तसेच रिंकूचा ‘झुंड’ हिंदी चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अमिताभ बच्चन अभिनित या चित्रपटात, तिच्यासोबत आकाश ठोसरही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.