Thursday, March 30, 2023

व्हॅलेंटाईन डे निमित्त ‘वेड’ कपलकडून चाहत्यांना स्पेशल गिफ्ट, सोशल मीडियावरल पोस्ट शेअर करत म्हणाले, …

मराठी आणि बॉलिवूड इंडस्ट्रीचं लाडकं कपल जिनेलिया देशमुख आणि रितेश देशमुख यांची जोडी नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधत असते. (दि, 30 डिसेंबर) रोजी या जोडप्याच्या ‘वेड‘ चित्रपट प्रदर्शित झाला असून बॉक्सऑफिसवर धूमाकुळ घाताला आहे. अजूनही थिएटरमध्ये चित्रपटाची क्रेज पाहायाल मिळत आहे. अशातच या प्रसिद्ध जोडीने व्हॅलेंटाईन डे निमित्त एक खास सरप्राईज आणलं आहे.

वेड (Ved) चित्रपट दिग्दर्शित रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) आणि जिनेलिया देशमुख (Genelia Deshmukh) यांनी (दि, 14 फेब्रुवारी ) रोजी म्हणजेच व्हॅलेंटाईन डे निमित्त एक खास सरप्राईज आणलं आहे. त्यांच्या वेड चित्रपटाने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावलं आहे. प्रेक्षकांतर्फे तुफान प्रतिसाद मिळाला असून अजूनही चाहते वेडचं कौतुक करत आहेत. या चित्रपटाने आजपर्यत 70 हून अधिक कोटींची कमाई केली आहे. प्रेक्षकांनी या चित्रपटाला दिलेल्या प्रेमाबद्दल रितेश-जिनिलीयाने व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने एक खास पोस्ट शेअर केली.

वेड चित्रपटाचं एक पोस्ट शेअर करत त्या दोघांनी सांगितलं की, “तुमचा व्हॅलेंटाईन डे अधिक स्पेशल बनवण्यासाठी 13 ते 16फेब्रुवारीदरम्यान ‘वेड’ सिनेमा 99 रुपयांत महाराष्ट्रभरातील थिएटर्समध्ये दाखवण्यात येईल.” त्यामुळे ‘वेड’ या चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा जिनेलीया आणि रितेश प्रेक्षकांचा व्हॅलेंटाईन वीक स्पेशल बनवण्यासाठी सज्ज झाले आहेत.

 

View this post on Instagram

 

सध्या सोशल मीडियावर रितेशच्या पोस्टवरही चाहत्यांनी तुफान प्रतिक्रिया दिली आहे. वेड चित्रपटाने तुफान क्रेज मिळवली आहे. अशातच रितेश आणि जिनेलियाने व्हॅलेंनटाइन डे दिवशी दोन प्रेमिंसाठी एक सुंदर गिफ्ट देण्यासठी सज्ज झाले आहेत. चाहत्यांनी रितेशने शेअर केलेल्या पोस्टवर प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
वर्षांनंतर रवीना टंडनने अक्षयसोबतच्या तुटलेल्या साखरपुड्याबद्दल साेडले मौन; म्हणाली, ‘तो दुसऱ्याला डेट…’
भारती सिंगच्या मुलाने वेधलं चाहत्यांचं लक्ष, सोशल मीडियावर व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

हे देखील वाचा