Friday, April 25, 2025
Home मराठी रितेश-जिनिलियाचा विषयचं खोल! गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये ‘वेड’ चित्रपटाने केली विक्रमाची नोंद

रितेश-जिनिलियाचा विषयचं खोल! गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये ‘वेड’ चित्रपटाने केली विक्रमाची नोंद

प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुखच्या ‘वेड‘ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतला. या चित्रपटाला लोकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. 15 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट सतत नवनवे रेकॉर्ड आपल्या नावावर करत आहे. दरम्यान, या चित्रपटाने आता आणखी एक टप्पा गाठला आहे. कमाईच्या बाबतीत हा चित्रपट मराठी इंडस्ट्रीत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. या चित्रपटाने ‘सैराट’ या ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या मागे आहे. आता आणखी एक विक्रम या चित्रपटाने केला आहे.

बाॅक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या वेड (ved) चित्रपटाचे नाव गिनिज वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये नोंदवण्यात आले आहे. टिव्हीवरील मराठी स्टार प्रवाह ही वाहिनी नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवून मराठी रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसते. इकतचं नाही तर ही वाहिनी आपली मराठी परंपरा जपण्याचे देखील काम करते. स्टार प्रवाह या वाहिनीने लाखो लोकांच्या मनात स्वत:ची अशी जागा निर्माण केली आहे. अशातच या वाहिनीने लोकांना अभिमान वाटेल असे काम केले आहे.

स्टार प्रवाहवर 20 ऑगस्टला सायंकाळी 7 वाजता ब्लॉकबस्टर वेड चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर पार पडणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने स्टार प्रवाहने एक अगळा वेगळा विक्रम रचला आहे. या विक्रमाची नोंद प्रतिष्ठित गिनिज वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये करण्यात आली. अभिनेता रितेश देशमुखच्या उपस्थितीत हा विक्रम रचण्यात आला आहे.

यावर रितेश देशमुखने प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, “मराठी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच असा वेगळा प्रयोग करण्यात आला आहे. स्टार प्रवाह वाहिनीने दिलेल्या या मौल्यवान क्षणांबद्दल मी आणि जिनिलिया त्यांचे मनापासून आभारी आहोत. त्यांच्या मेहनतीमुळे हे शक्य झाले. हिंदी सिनेसृष्टीत गेला 20 वर्ष मी काम करत आहे. पण तिकडे कधीच अस झालं नाही.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

स्टार प्रवाहचे बिझनेस हेड सतीश राजवाडे यांनी पोस्ट करून या विषयी माहिती दिली आहे. त्यांनी पोस्ट शेअर करताना लिहीले की, “अभिमानाचा क्षण….20 ऑगस्ट रोजी होणाऱ्या ‘वेड’ चित्रपटाच्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरसाठी स्टार प्रवाहने गिनिज वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये रचून महाराष्ट्राचे आणि मराठी चित्रपट सृष्टीचे नाव जगाच्या नकाशावर कोरले आहे. ही भव्यदिव्य कलाकृती साकारण्यासाठी तब्बल 1445 छत्र्यांचा वापर करण्यात आला होता. दोन दिवसांच्या अथक परिश्रमानंतर ही कलाकृती आकारास आली होती.” तसेच. त्यांनी प्रेक्षकांना वेड चित्रपट पाहण्याची विनंती केली आहे. (Riteish Deshmukh’s film ‘Ved’ entered the Guinness Book of World Records Star Pravah has taken a new initiative)

अधिक वाचा- 
पैसा कमावण्यासाठी ‘Adipurush’च्या निर्मात्यांनी खेळला मोठा डाव; एक नाही तर 2 OTTवर रिलीज केला सिनेमा
रुबीना दिलैक मोठ्या पडद्यावर धमाल करण्यासाठी सज्ज; पंजाबी चित्रपटांमध्ये पदार्पण करणार टीव्हीची ‘किन्नर सून’

हे देखील वाचा