Tuesday, September 26, 2023

पैसा कमावण्यासाठी ‘Adipurush’च्या निर्मात्यांनी खेळला मोठा डाव; एक नाही तर 2 OTTवर रिलीज केला सिनेमा

‘साहो’, ‘राधे श्याम’ हे फ्लॉप सिनेमांनंतर साऊथ अभिनेता प्रभास याच्यासह चाहत्यांनाही ‘आदिपुरुष‘ सिनेमाकडून भरपूर अपेक्षा होत्या. 16 जून रोजी चित्रपटगृहात रिलीज झाल्यानंतर सिनेमाने पहिल्या दिवशी जबरदस्त कमाई केली होती. मात्र, नंतर सिनेमाच्या कमाईत मोठी घट झाली. खरं तर, रिलीजपूर्वीपासूनच सिनेमा भलताच वादात अडकला होता. या सिनेमाने भावना दुखावल्याचा आरोप प्रेक्षकांकडून करण्यात आला होता. तसेच, 600 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमाच्या व्हीएफएक्सवरूनही प्रेक्षकांनी चित्रपटगृहात राडा घातला होता. आता अनेक वादांचा सामना केल्यानंतर हा सिनेमा ओटीटीवर येत आहे.

अशात चित्रपटगृहात रिलीज झाल्याच्या दोन महिन्यांनंतर निर्मात्यांनी कोणत्याही घोषणेशिवाय शुक्रवारी (दि. 11 ऑगस्ट) ओटीटीवर हा सिनेमा रिलीज केला आहे. विशेष म्हणजे, फक्त एकाच नाही, तर दोन ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा रिलीज करण्यात आला आहे. त्यामुळे ज्यांनी चित्रपटगृहात हा सिनेमा पाहिला नाही, ते प्रेक्षक ओटीटीवर हा सिनेमा पाहू शकतील.

‘आदिपुरुष’ सिनेमा ओटीटीवर
‘आदिपुरुष’ सिनेमाचे हिंदी व्हर्जन नेटफ्लिक्सवर पाहता येईल. तसेच, ऍमेझॉन प्राईम व्हिडिओवर ‘आदिपुरुष’ तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि कन्नडसह सर्व भाषांमध्ये उपलब्ध आहे. 600 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेला हा सिनेमा फक्त 390 कोटी रुपयेच कमावू शकला होता. या सिनेमाकडून प्रभासला खूपच आशा होत्या. मात्र, हा सिनेमा त्याच्यासाठी सर्वात मोठा फ्लॉप ठरला. आता निर्मात्यांना आशा आहे की, चाहते ओटीटीवर हा सिनेमा नक्की पाहतील.

सिनेमातील पात्र
‘आदिपुरुष’ (Adipurush) सिनेमात प्रभास (Prabhas), क्रिती सेन (Kriti Sanon), सैफ अली खान (Saif Ali Khan) यांच्या मुख्य भूमिका होत्या. त्यात प्रभास हा भगवान राम, क्रिती सीतेच्या आणि सैफ रावणाच्या भूमिकेत होता. मात्र, प्रत्येक पात्राशी संबंधित गोष्टीचा मुद्दा उचलून सिनेमाला जोरदार ट्रोल केले गेले होते. (actor prabhas adipurush movie released on ott know how and where to watch)

महत्त्वाच्या बातम्या-
सेन्सॉर बोर्डाची कात्री अन् वादात अडकूनही ‘OMG 2’ने जिंकली प्रेक्षकांची मने, देशभरातून होतंय कौतुक
राणी मुखर्जीचा धक्कादायक खुलासा! 2020मध्ये झालेल्या गर्भपाताविषयी म्हणाली, ‘5 महिन्यांच्या प्रेग्नंसी…’

हे देखील वाचा