×

इंडो-कॅनेडियन गायकाला डेट करतेय उर्फी जावेद? ‘त्या’ कमेंटने रंगवल्या चर्चा

आपल्या क्रिएटिव्ह आउटफिट्समुळे नेहमीच चर्चेत राहणारी बिग बॉस फेम उर्फी जावेद (Urfi Javed) सध्या तिच्या वैयक्तिक नात्यामुळे चर्चेत आहे. नुकताच व्हॅलेंटाईन डे झाला आहे. अशा परिस्थितीत उर्फीचे काही फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. ज्यात ती एका इंडो-कॅनडियन गायिकासोबत दिसत आहे. गायकाने अधिकृत अकाऊंटवरून उर्फीसोबतचा स्वतःचा एक फोटो देखील शेअर केला. ज्याला उर्फीने प्रतिक्रिया दिली आहे. उर्फीची प्रतिक्रिया पाहून चाहत्यांनी अंदाज लावला आहे की, अभिनेत्री या गायकासोबत रिलेशनशिपमध्ये आहे.

View this post on Instagram

A post shared by Urrfii (@urf7i)

उर्फीने व्हॅलेंटाईन डेनिमित्त शेअर केली पोस्ट, कुंवरने केली कमेंट
उर्फीने व्हॅलेंटाईन डेला एक पोस्ट शेअर केली. उर्फीने तिच्या चाहत्यांना व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा दिल्या होत्या. गायक कुंवरनेही त्या पोस्टवर कमेंट केली होती. कुंवरने उर्फीच्या पोस्टवर कमेंट करत लिहिले की, “हॅपी वी डे उर्फी जी.”

गायक कुंवरनेही केली पोस्ट, उर्फीने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
त्याचवेळी कुंवरनेही एक पोस्ट केली. ज्यासोबत त्याने लिहिले की, “इथे खूप काही शिजत आहे.” उर्फीने कुंवरची ही पोस्ट री-पोस्ट करत कॅप्शन लिहिले की, “मला माहित आहे की तू माझ्यावर प्रेम करतोस.” उर्फीच्या या प्रकरणावर चाहते विचारत आहेत की उर्फी गायक कुंवरला डेट करत आहे का? कुंवर त्याच्या गाण्यांसाठी चाहत्यांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. त्याने अफसाना खान आणि अनेक सेलिब्रिटींसोबत व्हिडिओ बनवले आहेत. आता लवकरच गायक कुंवरही त्याचा नवा प्रोजेक्ट लाँच करणार आहे.

View this post on Instagram

A post shared by 𝐊 𝐔 𝐍 𝐖 𝐀 𝐑 𝐑 (@kunwarrmusic)

उर्फीने तिच्या गायक कुंवरसोबत पोस्ट केलेल्या फोटोमध्ये तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “ते ८ डिग्री होत, मला या ड्रेसमध्ये एकच गाणं आठवतंय, तू जाने ना…. पण मी गायक नाही, कुंवर आहे आणि हो तो ६’३ आहे आणि मी ५’१ आहे.”

उर्फी शेवटची बिग बॉस ओटीटीमध्ये दिसली होती. येथून तिला ओळख मिळाली. तसे, उर्फी ‘ये रिश्ता क्या कहलाता है’, ‘चंद्र नंदिनी’, ‘कसौटी जिंदगी की’, ‘ए मेरे हमसफर’, ‘डायन’ आणि ‘बेपनाह’ यांसारख्या मालिकांमध्ये दिसली आहे.

हेही वाचा :

हेही पाहा-

Latest Post