Friday, November 22, 2024
Home बॉलीवूड ‘गोविंदाला त्याचा हक्क मिळाला नाही, आज तो सर्वात मोठा सुपरस्टार असता’, रोहित शेट्टीचे भाष्य

‘गोविंदाला त्याचा हक्क मिळाला नाही, आज तो सर्वात मोठा सुपरस्टार असता’, रोहित शेट्टीचे भाष्य

बॉलिवूडमध्ये सध्या सलमान खान, आमिर खान आणि शाहरुख खान यांचा जलवा असल्याचे दिसते. तसेच, अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार हेदेखील वर्षाकाठी 5-6 सिनेमे करत आहेत. असे असले, तरीही एक काळ असा होता, जेव्हा या सर्वांवर गोविंदा भारी पडायचा. 80 आणि 90च्या दशकात गोविंदाने बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा डंका वाजवला होता. त्याने 1986मध्ये सुपरहिट पदार्पण केल्यानंतर एकसोबत थेट 70 सिनेमे साईन केली होती. तो एका दिवशी 5-5 सिनेमांच्या शूटिंग करायचा. मात्र, आता गोविंदाकडे कोणताही मोठा सिनेमा नाहीये. त्याला पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारावी लागत आहे. याबद्दल दिग्दर्शक रोहित शेट्टी याने वक्तव्य केले आहे.

रोहित शेट्टी (Rohit Shetty) याने गोविंदा (Govinda) आणि त्याच्या स्टारडमबद्दल मोठे भाष्य केले आहे. तो म्हणाला आहे की, गोविंदाने ज्याप्रकारे 10 वर्षे सलग हिट सिनेमे दिले, त्याप्रकारे तो आज सुपरस्टार असायला पाहिजे होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Govinda (@govinda_herono1)

रोहित शेट्टीचे गोविंदाबद्दल वक्तव्य
एका मुलाखतीदरम्यान रोहित शेट्टी याने म्हटले की, “गोविंदाने 90च्या दशकात दिग्दर्शक डेविड धवन यांच्यासोबत सलग हिट सिनेमे दिले आहेत. दोघांची ब्लॉकबस्टर जोडी होती. त्या पोराने (गोविंदा) 10 वर्षांपर्यंत ब्लॉकबस्टर सिनेमे दिले. त्याने डेविड धवन यांच्यासोबत ‘शोला और शबनम’, ‘राजा बाबू’, ‘आंखें’, ‘जोडी नंबर 1’, ‘कुली नंबर 1’ आणि ‘हसीना मान जाएगी’ यांसारखे सलग हिट सिनेमे दिले. मला वाटते की, गोविंदाला त्याचा हक्क मिळाला नाही. नाहीतर तो आज सर्वात मोठा सुपरस्टार असता. आता सोशल मीडिया आहे. एक सिनेमा चालला, तर सर्वजण आरडाओरडा करतात. मात्र, त्यावेळी गोविंदा आणि डेविड धवन यांनी अनेक सलग हिट सिनेमे दिले होते.”

गोविंदाने केलेला खुलासा
काही काळापूर्वी गोविंदाने मनीष पॉलच्या एका पॉडकास्ट शोमध्ये खुलासा केला होता की, इंडस्ट्रीतील लोक कशाप्रकारे त्याच्या विरोधात गेले होते. तसेच, त्याच्यावर अव्यावसायिक असल्याचा आरोप लावला होता. गोविंदा म्हणाला होता की, “जेव्हा तुम्ही यशस्वी होता, तेव्हा अनेक लोक तुमचा पाय खाली खेचण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा मी 14-15 वर्षे सलग कारकीर्दीच्या शिखरावर होतो आणि सर्वकाही माझ्या बाजूने चालू होते, तेव्हा कुणीही माझ्यावर बोट दाखवले नाही.”

गोविंदा आणि डेविड धवन (David Dhawan) या जोडीने 1995मध्ये ‘कुली नंबर 1’ या हिट सीरिजची सुरुवात केली होती. ही सीरिज 1997नंतरही चालली. मात्र, काही वर्षांनंतर गोविंदाच्या कारकीर्दीताला उतरती कळा लागली आणि तो मुख्य प्रवाहातून बाहेर फेकला गेला. (rohit shetty on govinda says did not get his due in bollywood)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘शाहरुख खानला जिवंंत जाळेल’, अयोध्याच्या महंत परमहंसांची कॅमेऱ्यासमोर ‘किंग खान’ला धमकी
तमन्ना भाटियाने शेअर केला खासगी जेटमधील फोटो, चाहत्यांनी विचारले ‘मागे विराट कोहली काय करतोय?’

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा