Sunday, April 26, 2026
Home अन्य रुबीना दिलैकचा रिप्ड जीन्समधला धमाकेदार डान्स व्हिडिओ पाहिलाय का?

रुबीना दिलैकचा रिप्ड जीन्समधला धमाकेदार डान्स व्हिडिओ पाहिलाय का?

टेलिव्हिजनवरील रिऍलिटी शो बिग बॉस 14 या शोची विजेती अभिनेत्री रुबीना दिलैक हिचा काही दिवसांपूर्वी एक म्युझिक व्हिडिओ प्रदर्शित झाला होता. तिचे गलत हे गाणे सर्वत्र व्हायरल झाले होते. या गाण्यात ती बिग बॉस 13 चा स्पर्धक पारस छाबडा सोबत दिसली होती. गायिका असीस कौर हीने या गाण्याला तिचा आवाज दिला होता. केवळ दोन आठवड्यातच त्यांच्या या व्हिडिओला 4 कोटी पेक्षा देखील जास्त व्ह्यूज मिळाले आहे. रुबीनाने तिच्या याच गाण्यावर रिप्ड‌ जीन्स घालून एक व्हिडिओ बनवला आहे. तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

रुबीनाने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने तिच्या गलत या गाण्यावर जोरदार डान्स केला आहे. तिचा हा डान्स बघून तिचे सगळे चाहते हैराण झाले आहेत. तिने हा व्हिडिओ तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओवर तिच्या चाहत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत ,आणि सगळेजण तिचे कौतुक करताना देखील दिसत आहे. तर दुसरीकडे अनेक जण तिला रिप्ड जिन्स घातली म्हणून ट्रोल करत आहेत. तिचे अनेक चाहते तिला असे म्हणत आहे की, रुबीनाने ही जीन्स घालून खूप मोठी चूक केली आहे.

 

मागील काही दिवसांमध्ये रुबीनाचा वैयक्तिक मोबाईल नंबर हा एका अनाधिकृत वेबसाईटला लिंक केला गेला होता. त्यानंतर तिला अनेक वेगवेगळ्या ठिकाणाहून फोन येऊ लागले होते. यामुळे ती खूपच संकटात आली होती. तिचे हे संकट दूर करण्यासाठी तिचे वडील अभिनव यांनी त्यांच्या एका इंजिनियर मित्राकडे मदत मागितली. त्यांच्या मित्राने अनेक प्रयत्न करून शेवटी ती वेबसाईटच बंद करून टाकली.

या गोष्टीची माहिती स्वतः रुबीनाचे वडील अभिनय यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंट वरून दिली होती. त्यांनी असे लिहिले होते की, “एका अनधिकृत वेबसाईटवर बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींचे नंबर लिंक झाले आहेत. पण ती वेबसाईट बंद करण्यात आम्हाला यश आले आहे.”असे म्हणत त्यांनी त्यांच्या इंजिनियर मित्राचे देखील आभार मानले आहे. मित्राचे आभार मानताना त्यांनी लिहीले आहे की, “कोणत्याही इंजिनियर सोबत कधी पंगा घेऊ नका.”

हे देखील वाचा