Tuesday, April 16, 2024

अभिमानास्पद! महाराष्ट्राची रुपाली बाळेकुंद्री ठरली ‘मिसेस इंडिया क्लासिक ब्युटी युनिव्हर्स’

नवी दिल्ली येथे आयोजित ‘मिसेस एक्सक्लुझिव्ह क्लासिक ब्युटी इंडिया’ स्पर्धेत तगडी टक्कर पाहायला मिळाली. एकापेक्षा एक जबरदस्त परफॉर्मेन्स देत सर्व सुंदऱ्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. मात्र महाराष्ट्राची रुपाली बाळेकुंद्री हिने प्रतिष्ठेचा मिसेस इंडिया युनिव्हर्स हा किताब पटकावला आहे.

देशभरातून तब्बल ६५०० स्पर्धकांतून अंतिम ५० जणांची या स्पर्धेसाठी या निवड झाली होती. त्यातील १५ स्पर्धक मेगा फायनलसाठी पात्र ठरले. त्यानंतर या मेगा फायनलमधून ५ विजेते निवडण्यात आले. (Rupali Balekundre from maharashtra become ms exclusive classic beauty universe)

रुपाली बाळेकुंद्रीबद्दल बोलायचे झाले, तर ती पेशाने इंजिनिअर आहे. आजवर तिने अमेरिका, जपान आणि युरोपमध्ये नोकरीनिमित्त वास्तव्य केले आहे. मुळच्या मुंबईतील विलेपार्ले येथे राहणाऱ्या रुपालीने या स्पर्धेत आपल्या बुद्धिमत्तेने प्रेक्षकांची आणि परिक्षकाची मने जिंकली. रुपाली आता मिसेस युनिव्हर्स इंटरनॅशनेल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करेल. तर दुसरीकडे, महाराष्ट्राच्या सोनिया फर्नांडीजला प्रथम उपविजेतपदावर समाधान मानावे लागले.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे-
मिसेस इंडिया क्लासिक ब्युटी युनिव्हर्स – रुपाली बाळेकुंद्री (महाराष्ट्र)
मिसेस इंडिया क्लासिक ग्लोब किर्ती सिंग (दिल्ली)
मिसेस इंडिया क्लासिक ब्युटी वर्ल्ड – तसा डैजी (दिल्ली)
प्रथम उपविजेती – सोनिया फर्नांडिज (महाराष्ट्र)
व्दितीय उपविजेती- बीना पांडे (उत्तर प्रदेश)

हेही वाचा-

हे देखील वाचा