Tuesday, December 3, 2024
Home हॉलीवूड RussiaVsUkraine | दिलदार अभिनेता! रशियाशी झुंज देणाऱ्या युक्रेनसाठी दान केले तब्बल ‘इतके’ कोटी

RussiaVsUkraine | दिलदार अभिनेता! रशियाशी झुंज देणाऱ्या युक्रेनसाठी दान केले तब्बल ‘इतके’ कोटी

युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे. मात्र रशियासारख्या प्रचंड देशासमोर युक्रेन पूर्णपणे कोलमडले आहे. अनेक से लिब्रिटी युक्रेनच्या समर्थनार्थ आवाज उठवत आहेत. दरम्यान, टायटॅनिकचा अभिनेता लिओनार्डो डिकॅप्रियो (Leonardo Dicaprio) युक्रेनच्या मदतीसाठी पुढे आला आहे. रशियन सैन्य युक्रेनच्या विविध शहरांना सतत लक्ष्य करत आहे. दोन्ही देशांमधील युद्धबंदीबाबत झालेल्या वाटाघाटीतून काहीही निष्पन्न झाले नाही. दरम्यान, ऑस्कर विजेता अभिनेता लिओनार्डो डिकॅप्रियो युक्रेनच्या मदतीसाठी पुढे आल्याचे वृत्त आहे. डिकॅप्रियोने युक्रेनला आर्थिक मदत केली आहे. मात्र, या मदतीमागे एक मोठे कारण सांगितले जात आहे, जे आतापर्यंत त्याच्या चाहत्यांना माहीत नव्हते.

डिकॅप्रियोचे युक्रेनशी विशेष संबंध
लिओनार्डो डिकॅप्रियोने युक्रेनला १० मिलियन डॉलर्स म्हणजेच, सुमारे ७६ कोटी रुपयांची देणगी दिली आहे. त्यामागील एक मोठे कारण म्हणजे त्यांची दिवंगत आजी. लिओनार्डोची आजी ओडेसा (युक्रेन) येथील होती. ज्यांचे २००८ मध्ये निधन झाले. लिओनार्डो त्याच्या आजीच्या खूप जवळ होता. अशा परिस्थितीत, अभिनेत्याचे ओडेसा (युक्रेन) सोबतही घट्ट नाते आहे. ओडेसा हे तेच शहर आहे, जिथे रशियाने भयंकर मिसाईल आहेत. जेट फायटर या शहरावर सतत बॉम्बफेक करत आहेत. अशा परिस्थितीत लिओनार्डोला ओडेसामध्ये आजीसोबत घालवलेला वेळ आठवतो.

टायटॅनिकमधून प्रसिद्ध झाला लिओनार्डो डीकॅप्रियो
लिओनार्डो डिकॅप्रियोला तुम्ही ‘टायटॅनिक’ या चित्रपटातून ओळखत असाल. या चित्रपटाने डिकॅप्रियोला सुपरस्टार बनवले. या चित्रपटात त्याच्यासोबत केट विन्सलेट दिसली होती. ‘टायटॅनिक’ व्यतिरिक्त डिकॅप्रियोने ‘ब्लड डायमंड’, ‘द एव्हिएटर’, ‘द वुल्फ ऑफ वॉल स्ट्रीट’, ‘द रेवेनंट’, ‘इनसेप्शन’ यासह अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

लिओनार्डोचे आजी-आजोबा होते रशिया आणि जर्मनीचे
लिओनार्डो हा त्याच्या पालकांचा एकुलता एक मुलगा आहे. त्याची आई कायदेशीर सचिव होती आणि वडील कॉमिक्स कलाकार तसेच वितरक होते. लिओनार्डो एक वर्षाचा होता, जेव्हा त्याच्या पालकांनी घटस्फोट घेतला. लिओनार्डोचे आजी-आजोबा रशिया आणि जर्मनीचे होते.

काही दिवसांपूर्वी युक्रेनबद्दल चिंता व्यक्त करताना प्रियांका चोप्राने (Priyanka Chopra) तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आणि लिहिले की, “युक्रेनमधील परिस्थिती खूपच भयानक आहे. निष्पाप आणि निष्पाप लोक स्वत:च्या आणि कुटुंबाच्या जीवासाठी भीतीच्या छायेखाली जगत आहेत. आजच्या आधुनिक जगात अशी भितीदायक परिस्थिती कशी निर्माण होऊ शकते हे समजणे कठीण आहे? या युद्धात जे निष्पाप लोक लढत आहेत ते तुमच्या-माझ्यासारखेच आहेत. युक्रेनच्या लोकांना पुढे येऊन कशी मदत करावी याबद्दलची सर्व माहिती माझ्या बायो लिंकवर मिळेल.”

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धावर हॉलिवूड कलाकारांसोबतच बॉलिवूडही प्रतिक्रिया देताना दिसत आहे. सोनू सूद, जावेद अख्तर, प्रियांका चोप्रा, रिचा चढ्ढा, स्वरा भास्कर यांसारखे कलाकार हे युद्ध संपवण्याची मागणी करत आहेत.

हेही वाचा –

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा