एसपी बालसुब्रमण्यम (S. P.Balasubramanyam) हे संगीत जगताचे बादशाह म्हणून जगभरात लोकप्रिय होते . 4 जून 1946 रोजी मद्रासमध्ये जन्मलेल्या एसपी बालसुब्रमण्यम यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक गाण्यांना आवाज दिला, ज्यांची जादू कधीही कमी होऊ शकत नाही. लहानपणापासूनच संगीताची आवड असल्याने त्यांनी अभियांत्रिकीच्या शिक्षणासोबत संगीताचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली. एसपी बालसुब्रमण्यम यांनी हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड तसेच मल्याळममध्ये आपल्या आवाजाची जादू पसरवली आहे. 2020 मध्ये या ज्येष्ठ गायकाचे कोरोनामुळे निधन झाले. आज(25 सप्टेंबर) त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त जाणून घेऊया त्यांच्या आयुष्यातील रंजक किस्से.
एसपी बालसुब्रमण्यम यांचा जन्म मद्रासमध्ये एसपी सांबामूर्ती आणि शकुंतलम्मा यांच्या पोटी झाला. त्यांना दोन भाऊ आणि पाच बहिणी आहेत. त्यांचे वडील विविध नाटकांमध्ये काम करणारे अभिनेते होते. तर त्यांची आई गृहिणी होती. अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना टायफॉइडमुळे त्यांना शिक्षण सोडावे लागले, जे त्यांनी नंतर पूर्ण केले. त्याचबरोबर अभ्यासासोबतच ते अनेक संगीत स्पर्धांमध्ये भाग घेऊ लागले.
एसपी बालसुब्रमण्यम यांनी 15 डिसेंबर 1966 रोजी ‘श्री श्री श्री मेरीदा रमन्ना’ या चित्रपटाद्वारे आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. त्यांना सहा वेळा सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. त्याचवेळी त्यांना 2001 मध्ये पद्मश्री आणि 2011 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वेगवेगळ्या भाषांमध्ये 40,000 गाणी गाण्याचा गिनीज रेकॉर्डही त्यांच्या नावावर आहे.
एक प्रसिद्ध गायक असण्यासोबतच ते संगीत दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माता देखील होते. एवढेच नाही तर त्यांनी व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट म्हणूनही काम केले आहे. त्यांनी कमल हासन, रजनीकांत, सलमान खान, शाहरुख खान, अनिल कपूर आणि गिरीश कर्नाड यांच्यासाठी व्हॉईस ओव्हर केले आहेत. त्यांना डबिंगसाठी नंदी पुरस्कार देखील मिळाला आहे, तेलुगू सिनेमा, थिएटर आणि टीव्हीसाठी आंध्र प्रदेश सरकारचा सर्वोच्च सन्मान आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘क्लासिक गाण्याची वाट लावू नको’ म्हणणाऱ्या फाल्गुनी पाठकला नेहा कक्करने दिले सडेतोड उत्तर
श्रेयस तळपदेच्या “बेबीफेस”ची सोशल मीडियावर चर्चा, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
रुपाची खान, दिसती छान! अरबाजची गर्लफ्रेंड आहे खूपच संंदर अन् ग्लॅमरस; अशी केली बॉलिवूड एन्ट्री