अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीच्या (Nawazuddin Siddiqui)’सेक्रेड गेम्स’ वेब सिरीजने अश्लील आणि भडक दृश्यांच्या सगळ्याच मर्यादा पार केल्या होत्या. या सिरीजमध्ये अनेक अभिनेत्री बोल्ड आणि हॉट सीन देताना दिसून आल्या. मात्र सगळ्यात जास्त झाली ती नवाझुद्दीन सिद्दिकीच्या बायकोची भूमिका साकारणार्या सुभद्राची. आता या सुभद्राने सोशल मीडियावर केलेली पोस्ट सध्या चर्चेत आली आहे.
‘सेक्रेड गेम्स’ वेब सिरीज अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीच्या अभिनयाने जितकी गाजली तितकीच ती त्याच्या पत्नीची भूमिका साकारलेल्या सुभद्राच्या इंटिमेट सीनमुळे गाजली. ही सुभद्राची भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजेच राजश्री देशपांडे (Rajashri Deshpande). सेक्रेड गेम्समध्ये राजश्रीने दिलेले बोल्ड सीन पाहून कुणालाही घाम फुटेल असेच ते सीन होते. तेव्हापासूनच अभिनेत्री राजश्री लोकप्रिय झाली. त्यावेळी तिच्या बोल्ड सीनमुळे तिला अश्लील मेसेजसुद्धा येत होते. आता पुन्हा एकदा राजश्री तिच्या सोशल मीडियावरील फोटोमुळे चर्चेत आली आहे.
अभिनेत्री राजश्री पांडेने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती आपल्या केसांना सावरत स्मितहास्य करताना दिसत आहे. यासोबत राजश्रीने दिलेले कॅप्शन सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. हा मनमोहक फोटो शेअर करत राजश्रीने, “तुमचे हात नेहमीच व्यस्त असावेत, तुमचे पाय नेहमी वेगवान असावेत, जेव्हा बदल होईल तेव्हा तुमचे मन नेहमीच प्रसन्न असावे आणि तुम्ही नेहमी तरुण राहावे.” असे सुंदर कॅप्शन दिले आहे. सध्या या फोटोची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे.
अभिनेत्री राजश्री पांडे नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते. कधी साधे तर कधी बोल्ड फोटो शेअर करत असते. तिचे चाहते सुद्धा या फोटोंवर जोरदार प्रतिक्रिया देत असतात तिचे कौतुक करत असतात. राजश्रीने अनेक चित्रपटातसुद्धा काम केले आहे. ज्यामध्ये ‘तलाश’, ‘किक’, ‘सेक्सी दुर्गा’ अशा गाजलेल्या चित्रपटांचा समावेश आहे. मात्र सेक्रेड गेम्समधील तिच्या बोल्डनेसने सगळ्या सीमा पार केल्या होत्या. या सिरीजमुळेच तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली.
हेही वाचा –