×

जेव्हा प्रियांका चोप्राला करायचे होते भारतीय क्रिकेटपटूशी लग्न, कारण ऐकुन तुम्हालाही वाटेल अभिमान

प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) ही हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. प्रियांका सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसोबत ती आपले फोटो, व्हिडिओ शेअर करत असते. आता प्रियांकाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तिने दिलेले एक उत्तर ऐकून प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल. काय आहे हा व्हिडिओ चला जाणून घेऊ.

अभिनेत्री प्रियांका चोप्रा आपल्या दमदार अभिनयासाठी प्रसिद्ध आहे. अनेक वर्ष तिने हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला आहे. प्रियांकाच्या अभिनयाइतकीच तिच्या सौंदर्याची सुद्धा नेहमीच चर्चा होत असते. बॉलिवूड ते हॉलिवूड असा यशस्वी प्रवास तिने पूर्ण केला आहे. प्रियांकाने आपल्या अभिनयाची सुरुवात मिस वर्ल्डचा किताब मिळवल्यानंतर केली होती. प्रियांका सध्या भारतात जास्त नसली, तरी तिचे आपल्या मायदेशावर खूप प्रेम आहे. याचीच साक्ष देणारा एक व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे.

प्रियांकाचा हा व्हायरल होत असलेला व्हिडिओ २००० सालचा आहे. ज्यावेळी प्रियांकाने लग्नासाठी क्रिकेटपटूची निवड केली होती. ज्याचे कारण खूपच सुंदर होते. प्रियांका मिस वर्ल्डच्या स्पर्धेत सहभागी झाली होती, त्यावेळी तिची मुलाखत घेण्यात आली होती. त्याचवेळचा हा व्हिडिओ आहे. यामध्ये अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) परीक्षक म्हणून दिसत आहे. यावेळी प्रियांकाला शाहरुख खानने एक प्रश्न विचारला होता. ज्यामध्ये तो म्हणतो की “माझा प्रश्न थोडा काल्पनिक आहे आपण लग्न कोणासोबत करू इच्छिता. त्यासाठी तुम्हाला तीन पर्याय देण्यात येतील. यामध्ये पहिला पर्याय आहे क्रिकेटपटू अजहर जो सगळे जग फिरवून आणेल, ज्याचा देशाला अभिमान असेल. दुसरा पर्याय आहे मोठा उद्योगपती जो खूप गिफ्ट देईल. आणि तिसरा पर्याय आहे माझ्यासारखा अभिनेता.”

हे पर्याय ऐकून प्रियांकाने क्षणाचाही विलंब न करता क्रिकेटपटूला आपला पती म्हणून निवडला. कारण तो देशाची मान उंचावेल आणि देशाला त्याचा सदैव अभिमान वाटेल. प्रियांकाचे हे उत्तर ऐकून सगळेच खुश झाले.

हेही वाचा –

Latest Post