मराठी मनोरंजनविश्वातील अतिशय हरहुन्नरी आणि प्रतिभावान अभिनेता म्हणजे समीर चौगुले. समीरने त्याच्या विनोदाच्या प्रतिभेच्या जोरावर स्वतःची एक ओळख निर्माण केली. त्याच्या या ओळखीमध्ये महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोचा देखील मोठा वाटा आहे. या शोमुळे समीरला एक अभिनेता म्हणून ओळख तर मिळाली सोबतच एक उत्तम लेखक म्हणून देखील तो ओळखू जायला लागला आहे. समीर चौगुले म्हटल्यावर आता तर प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर नकळत एक हसू येतच असते. उत्तम विनोद बुद्धीच्या जोरावर त्याने संपूर्ण जगात नावलौकिक कमवला आहे.
समीर चौगुलेने नुकतीच एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये त्याने अनेक प्रश्नावर दिलखुलास उत्तरे देत अनेक किस्से देखील सांगितले, सोबतच त्याने पुरुषांनी स्त्री पात्र करणे याकडे तो कसा बघतो यावर देखील त्याचे मत व्यक्त केले. यावेळी त्याने अप्रत्यक्षपणे चला हवा येऊ द्या या कार्यक्रमावर भाष्य केले आहे.
View this post on Instagram
या मुलखतीमध्ये समीर म्हणाला, “पुरुष कलाकारांनी स्त्री भूमिका साकारण्यावर तुम्ही प्रश्न विचारत कोणत्या कार्यक्रमाबद्दल बोलत आहात हे माझ्या लक्षात आले आहे. मात्र मला असे वाटते की, त्या कार्यक्रमाचे स्वरुप वेगळे आहे. त्या शोमध्ये चित्रपटाचे प्रमोशन करणे हा मुख्य उद्देश आहे. तर दुसरीकडे आमच्या शोमध्ये आम्ही प्रमोशन एवढे नाही करत. आमच्या शोचे स्वरुप वेगळे आहे. आम्ही एक गोष्ट सादर करतो. एका भागात आम्ही तीन गोष्टी दाखवतो. आठवड्यातून ४ दिवस अर्थात १२ स्किट आम्ही सादर करतो. आमच्या शोमध्ये तसे काही जास्त होत नाही आणि ते चालत नाही. जशी कथा असेल त्याप्रमाणे आम्ही मांडणी करतो. कथेप्रमाणे कार्यक्रमात पात्र येतात आणि तुम्हाला हसवतात.”
दरम्यान समीर चौगुले यांनी महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोआधी अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये उत्तम भूमिका देखील साकारल्या आहेत. विनोदी भूमिकांसोबत त्यांनी गंभीर भूमिका देखील केल्या आहेत.
अधिक वाचा-
– सुयश टिळकची पत्नी ‘या’ हिंदी मालिकेत करणार एण्ट्री; आयुषी म्हणाली…
–काळ्या रंगाच्या शॉर्ट वनपीसमधील जान्हवीचा हटके लूक व्हायरल