Thursday, April 25, 2024

‘आम्ही शेवट्पर्यंत सोबतच प्रवास करू’, म्हणत सायरा बानो यांनी व्यक्त केले दिलीप कुमारांबद्दल असलेले प्रेम

बॉलीवूडचे जेष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे जुलै महिन्यात दुःखद निधन झालं. त्यांच्या निधनाने संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली होती. दिलीप कुमार हे इंडस्ट्रीमधील दिग्गज अभिनेते होते. त्यांना अभिनयाचे विद्यापीठ म्हटले तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. प्रभावी आणि जिवंत अभिनयाच्या जोरावर त्यांनी संपूर्ण बॉलिवूडवर अधिराज्य गाजवले. दिलीप कुमार यांच्या मृत्यूचा मोठा धक्का त्यांच्या पत्नी सायरा बानो यांना बसला आहे. दिलीप कुमारांच्या जाण्याने त्या एकाकी आयुष्य जगत आहेत. दिलीप कुमार यांच्या निधनानंतर त्यांनी स्वतःला सर्वांपासून लांब केले आहे. अलीकडे पहिल्यांदाच त्यांनी माध्यमांसमोर पती दिलीप कुमार यांच्या बद्दल भावना व्यक्त केल्या तसेच त्यांच्या चाहत्यांचे सुद्धा त्यांनी आभार मानले.

एका मोठ्या वृत्त समूहाला सायरा बानो यांनी स्वतःच्या हाताने लिहलेले एक पत्र दिले होते यामध्ये त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या मध्ये त्या लिहतात की, ‘११ ऑक्टोबरला आमच्या लग्नाचा वाढदिवस होता, म्हणून मी हे पत्र आमच्या परिवाराला, मित्रांना, चाहत्यांना आणि शुभचिंतकांना, उद्देशून लिहीत आहे. ज्यांनी आमच्यावर खुप खुप प्रेम केलं.’

या पत्रात त्या पुढे लिहतात की, ‘दिलीप साहेब आणि मी, जेव्हा वेळ स्थिर होती आणि आकाशात लाखो तारे झगमगत होते. आमच लग्न, एका आनंदी आयुष्याची सुरुवात आणि आता काहीच नाही, आम्ही आजही सोबत चालतो एकमेकांच्या हातात हात घालून आमच्या विचारात, आणि असच कायम चालत राहू. दिलीप कुमार हे आदर्श दीपस्तंभ होते फक्त माझ्यासाठीच नव्हे तर त्या संपूर्ण पिढीसाठी ज्यांनी समाजात पुढे पाऊल टाकले आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाने आदर्श निर्माण केला.’

दिलीप कुमार यांच्या निधनानंतर सायरा बानोंची प्रकृती खालावली होती. त्यांना श्वसनाचा त्रास होत होता. ब्लड प्रेशरची समस्या उद्भवल्याने त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करून त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना अँजिओग्राफी करण्याचा सल्ला दिला होता.

दिलीप कुमार आणि सायरा बानोंचे निकटवर्ती फैजल फारुखी यांनी एका मुलाखतीत बोलताना सांगितले की, “दिलीप कुमार यांच्या जाण्याने सायरा बानो एकाकी पडल्या आहेत. त्यांनी त्यांच्या आयुष्याची ५५ वर्ष दिलीप कुमार यांच्या सोबत घालवली. आपण फक्त त्यांच दुःख समजू शकतो. दिलीप कुमार यांच्या जाण्याने त्यांच्या आयुष्यात पोकळी निर्माण झाली असून, बहुतेक त्यांना दुःख आणि एकटेपणा त्रास देत आहे.”

दरम्यान दिलीप कुमार आणि सायरा बानो १९६६ मध्ये विवाह बंधनात अडकले होते. सायरा बानो आणि दिलीप कुमार यांच्या वयात तब्बल २२ वर्षाच अंतर होतं.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मी माझ्या हृदयाच्या जवळ ठेवते’, म्हणत सिद्धार्थ मल्होत्रासोबतच्या नात्याबद्दल बोलली कियारा\

-जॅकलिन फर्नांडिसचे ब्लॅक ब्रालेट, शिमरी जॅकेटमधील बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल

-आसामच्या फ्लोरिना गोगोईने पटकावले ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’चे विजेतेपद

हे देखील वाचा