Wednesday, December 6, 2023

ज्याच्यावर ठेवला विश्वास त्यानेच दिले चुकीचे उत्तर, स्पर्धकाने गमावले एवढे लाख

छाेट्या पडद्यावरील प्रसिद्ध क्विझ शो ‘कौन बनेगा करोडपती‘चा प्रत्येक सीझनच धमाकेदार असतो. आजकाल केबीसी ज्युनियर्स खूप चर्चेत आहे. या शाेमध्ये 8 ते 15 वर्षे वयोगटातील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. या शोमध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक खास विद्यार्थी हॉट सीटवर बसले आहेत, पण केबीसीच्या या सीझनवर जे काही पाहायला मिळाले ते आतापर्यंतच्या इतिहासात कधीच पाहायला मिळाले नव्हते. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, या शोमध्ये पहिल्यांदाच एखाद्या स्पर्धकाने एक्सपर्टमुळे जिंकलेली रक्कम गमावली. तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे खरे आहे. शोमध्ये आलेला स्पर्धक एक्सपर्टमुळे 6 लाख रुपये गमावून बसला. काेणता आहे ताे प्रश्न, ज्याचे उत्तर खुद्द एक्सपर्टनेच चुकीचे दिले, चला जाणून घेऊया…

केसीबी ज्युनियर्समध्ये, कर्नाटकातील दिवित भार्गवला बिग बींच्या समोर हॉट सीटवर बसण्याची संधी मिळाली. दिवितने आपल्या खेळाने सर्वांना प्रभावित केले. परंतु जेव्हा तो एका प्रश्नावर अडकला तेव्हा त्याने एक्सपर्टची मदच घेणे गरजेचे समजले आणि दिवितचा हाच निर्णय त्याच्यावर भारी पडला. 10 वर्षांचा दिवित भार्गव शोमध्ये चांगला खेळत होता, पण 6,40,000 च्या प्रश्नावर ताे अडकला. अशा परिस्थितीत दिवीत यांनी एक्सपर्ट मदत घेण्याचे ठरवले.

दिवित भार्गव याला सहा लाख चाळीस हजारसाठी विचारण्यात आलेला प्रश्न असा हाेता की, कोणत्या क्षेत्रात पती-पत्नी जोडीला संयुक्तपणे नोबेल पारितोषिक मिळालेले नाही?

केबीसीमध्ये या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी एक्सपर्ट सृजन पाल सिंग यांना बोलावण्यात आले हाेते. एक्सपर्टने 6 लाख रुपये जिंकण्यात दिवीतला पूर्ण मदत होईल अशी आशा बाळगली होती, पण सगळा खेळ उलटला. सृजन पाल सिंग यांनी दिलेले उत्तर चुकीचे निघाले. या कारणामुळे भार्गव शोमधून केवळ 3 लाख, 20 हजार रुपये घेऊन जाऊ शकला. यामुळे भार्गव खूप निराश झाला.

सृजन पाल सिंह यांनी माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे सल्लागार म्हणून काम केले आहे. इतकंच नाही तर शास्त्रज्ञ आणि लेखक म्हणूनही त्यांची ओळख आहे. अशा स्थितीत त्याचे चुकीचे उत्तर देणे धक्कादायक होते. (tv `show kaun banega crorepati junior contestent divit bhargava lost 6 lakh 40 thousand rupees because of expert advice he give wrong answer mega`star amitabh bachchan)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘बेशरम रंग’च नाही, तर ‘या’ गाण्यांमुळेही झाला हाेता माेठा वाद, एकदा पाहाच यादी

देवोलीना भट्टाचार्जी आपल्या पतीला मिठी मारून रडली ढसाढसा; म्हणाली, ‘दिव्याने शोधले असते…’ 

हे देखील वाचा