Thursday, June 13, 2024

‘टायगर 3’च्या सेटवरून व्हिडिओ लीक! शाहरुख अन् सलमानचा लूक पाहण्यासाठी चाहते उत्सुक

किसी का भाई किसी की जान‘ नंतर, सलमान खान सध्या त्याच्या मोस्ट अवेटेड चित्रपट ‘टायगर 3‘ साठी सतत चर्चेत आहे. या चित्रपटाबाबत रोज नवनवीन अपडेट समोर येत आहेत. अशात भाईजानच्या या स्पाय थ्रिलर चित्रपटाची त्याचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. अशा परिस्थितीत जेव्हापासून ‘पठाण’ म्हणजेच शाहरुख खानच्या कॅमिओची बातमी समोर आली आहे, तेव्हापासून चाहत्यांचा उत्साह चौपट वाढला आहे. या दरम्यान आता ‘टायगर 3’च्या सेटवरील व्हिडिओ इंटरनेटवर लीक झाला आहे. काय आहे व्हिडिओमध्ये? चला, जाणून घेऊया…

‘टायगर 3’ च्या सेटवरील व्हायरल व्हिडिओ एका फॅन पेजने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आधी सलमान खान (salman khan) आणि नंतर शाहरुख खान (shah rukh khan) दिसत असून दोघेही सेटच्या आत जात आहेत. अशात व्हिडीओमध्ये अभिनेत्याची फक्त एक छोटीशी झलक दिसत असली, तरी चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by neelikhan (@neelikhan786)

अशात शाहरुख खानच्या लूकबद्दल बाेलायचे झाले, तर अभिनेता ब्राऊन शेडचा टी-शर्ट आणि काळी कार्गो पँट घातलेला दिसत आहे. त्याचवेळी, अभिनेत्याच्या चेहऱ्यावर काही दुखापतीच्या खुणाही दिसत आहेत, ज्यावरून हे चित्रीकरणाचा एक भाग असल्याचे स्पष्ट होत आहे. दुसरीकडे, सलमान खानच्या लूकबद्दल बोलयचे झाले, तर त्याने तपकिरी रंगाचा टी-शर्ट आणि काळी पँट परिधान केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

व्हिडिओमध्ये, अभिनेता त्याच्या दबंग स्टाईल वॉकसह सेटवर पाेहचल्याचे दिसत आहे आणि यासाेबतच त्यांच्यासाेबत अनेक लोकही आहेत. अशात या व्हिडिओमुळे दोन्ही खानला पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता चांगलीच वाढली आहे.(bollywood actor salman khan shah rukh khan video leak from tiger 3 seat during action sequence katrina kaif watch video)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही नक्की वाचा-
‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम अभिनेता गंभीर जखमी; अभिनेत्री श्वेता मेहंदळेने दिली ‘ही’ माहिती

महाभारत फेम ‘या’ अभिनेत्याची तब्येत बिघडली, गंभीर परिस्थिती केले रुग्णालयात दाखल

हे देखील वाचा