Sunday, December 8, 2024
Home बॉलीवूड सलमान खान आणि संगीता बिजलानीचे लग्न का मोडलं? एक्स गर्लफ्रेंडने केला धक्कादायक खुलासा; म्हणाली…

सलमान खान आणि संगीता बिजलानीचे लग्न का मोडलं? एक्स गर्लफ्रेंडने केला धक्कादायक खुलासा; म्हणाली…

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आणि अभिनेत्री संगीता बिजलानी हे एकेकाळी एकमेकांच्या प्रेमात बुडालेले होते. दोघांनी एकत्र अनेक चित्रपटांमध्ये काम केले आणि त्यांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली. या जोडीला लग्न करायचे होते आणि त्यासाठी दोघांनी लग्नपत्रिकाही छापून घेतल्या होत्या. मात्र ऐनवेळी दोघांनीही लग्न न करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामागे काय कारण होते, हे आजही गुलदस्त्यात आहे.

सलमान खान ( Salman Khan) आणि संगीता बिजलानी (Sangeeta Bijlani) यांच्या लग्नाची बातमी ऐकून बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली होती. मात्र ऐनवेळी दोघांनीही लग्न न करण्याचा निर्णय घेतल्याने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. या निर्णयामागे काय कारण होते, याबाबत अनेक तर्कवितर्क लावले गेले. काही लोकांनी सांगितले की, सलमान खानचा स्वभाव संगीता बिजलानीला आवडत नव्हता. तर काही लोकांनी सांगितले की, सलमान खानच्या आक्रमक स्वभावामुळे संगीता बिजलानी घाबरली होती.

काही लोकांनी सांगितले की, सलमान खानचे नाव इतर अभिनेत्रींबरोबर जोडले जात होते, ज्यामुळे संगीता बिजलानीला राग आला होता. सलमान खान आणि संगीता बिजलानी यांनी लग्न न करण्यामागे काय कारण होते, हे आजही एक गूढ आहे. मात्र या घटनेमुळे दोघांच्याही नात्याला मोठा धक्का बसला होता आणि ते एकमेकांपासून दूर गेले. नुकतेच अभिनेत्रीने त्यामागील कारण सांगितले आहे. संगीता बिजलानी आणि सलमान खान 1986मध्ये रिलेशशिपमध्ये होते.

माध्यमांशी बोलताना सलमानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीने (Somi Ali News) त्यांच्या नात्याबद्दल खुलासा केला आहे. तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. सोमी अलीने सांगितले की, “1995 मध्ये, जेव्हा खान आणि अभिनेत्री संगीत बेंद्रे लग्न करण्यासाठी सज्ज होते, तेव्हा मला आणि सलमान खान माझ्या अपार्टमेंटमध्ये रंगेहाथ पकडले गेले. त्यावेळी मी 20 वर्षांची होती आणि खान 29 वर्षांचा होता.”

तसेच ती पुढे म्हणाली की, “जेव्हा मी थोडी मोठी झाले, तेव्हा मला याबद्दल समज आले. त्यावेळी मला सलमान खूप आवडायचा. मला त्याच्याबरोबर लग्न करायचे होते. पण सलमानने माझे शोषण केले. अलीने सांगितले की, सलमान खान तिला मारहाण करायचा आणि म्हणायचा की, मी तुला का मारहाण करतो, याचे कारण तुला माहितेय का? कारण मी तुझ्यावर प्रेम करतो.”

अलीने सांगितले की, सलमान खानच्या माझ्याबरोबरच्या वर्तनामुळे मला अनेक मानसिक समस्या उद्भवल्या. “मी अजूनही त्याच्या वर्तनाच्या परिणामांशी झुंज देत आहे. मला त्रास होतो, नैराश्य येते आणि मला झोप येत नाही.” (Salman Khan and Sangeeta Bijlani marriage broke up ex-girlfriend made a shocking revelation)

अधिक वाचा-
Hotness Alert! मौनी रॉयचा सुपरबोल्ड व्हिडीओ पाहून फॅन्सची उडली झोप; दिशा पटानी म्हणाली…
86 वर्षांची साथ सुटणार! डबल डेकर बसच्या अखेरच्या दिवशी ‘हे’ कलाकार भावुक; मिका सिंग म्हणाला…

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा