बाॅलिवूड मधील अनेक अभिनेत्री त्याच्या सौंदर्यच्या जोरावर चाहत्यांच्या मनात एक विषेश स्थान निर्माण करत असतात. टीव्ही ते बॉलिवूड असा प्रवास करणारी अभिनेत्री मौनी रॉय होय. ती सोशल मीडियावर आपल्या हॉट हटके फोटोनी खळबळ निर्माण करत असते. अलीकडेच, मौनीने तिचे लेटेस्ट फोटो शेअर करून चाहत्यांना वेड लावले आहे. नुकताच त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.
या व्हिडिओमध्ये ती किलर स्टाईलमध्ये डान्स करताना आणि हॉट मूव्ह्स दाखवताना दिसत आहे. अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) अनेकदा तिच्या बोल्ड लूकचे फोटो आणि व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करत असते. यावेळीही तिने असाच एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मौनी काळ्या रंगाचा चमकदार ड्रेस परिधान करून डान्स करत आहे आणि हॉट मूव्ह दाखवत आहे.
या डीप नेक ड्रेसमधला मौनीचा किलर लूक चाहत्यांना आवडला आहे. या व्हिडिओमध्ये मौनी ‘दिल को हजार बार’ गाण्यावर डान्स करत आहे. या व्हिडिओसोबत त्याने कॅप्शनमध्ये ‘टून्स’ लिहिले आहे. अभिनेत्री मौनी रॉयचा हा हॉट लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. तिच्या या व्हिडिओवर कमेंट करताना दिशा पटानीने लिहिले की ‘सो हॉट.’ मौनीच्या या व्हिडिओवर काही चाहत्यांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘मौनी इंडस्ट्रीतील सर्वात प्रतिभावान डान्सर आणि अभिनेत्री आहे’. दुसऱ्याने लिहिले, ‘खूप सुंदर आणि हॉट’.
View this post on Instagram
मौनी रॉय तिच्या बोल्ड लुक्स आणि किलर स्टाईलने अनेक बॉलिवूड अभिनेत्रींशी स्पर्धा करते. मौनी रॉयने एकता कपूरच्या ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’ या शोमधून तिच्या करिअरची सुरुवात केली. मौनीने टेलिव्हिजनपासून बॉलीवूडपर्यंतचा बराच पल्ला गाठला आहे. या अभिनेत्रीने ‘नागिन’ या मालिकेने घराघरात आपले नाव निर्माण केले . यानंतर तिने अक्षय कुमारसोबत ‘गोल्ड’ आणि अयान मुखर्जीच्या ‘ ब्रह्मास्त्र’मध्ये काम केले आहे. (Actress Disha Patani commented after seeing Mouni Roy superbold video)
अधिक वाचा-
–किरण मानेंना ‘जवान’ची भुरळ; ‘चलेया’ गाण्यावरील जबरदस्त डान्सचा व्हिडीओ व्हायरल; चाहते म्हणाले…
–धक्कादायक! रिंकू राजगुरूच्या इन्स्टाग्रामवरील सर्व पोस्ट झाल्या डिलीट? जाणून घ्या काय आहे नेमकं कारण