गरजूंसाठी पुन्हा सरसावला ‘भाईजान!’ २५००० कामगारांना ‘अशाप्रकारे’ करणार मदत

salman khan came forward to help the 25 thousand daily wage workers ofthe industry will transfer 1500 rupees to-every needy account


कोरोना संसर्गाच्या दुसर्‍या लाटेमुळे बरेच कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. दररोज कोट्यवधी लोकांना कोरोनाची लागण होत आहे. सामान्य लोकांपासून ते सेलेब्रिटीपर्यंत, सर्वचजण या भयंकर विषाणूच्या भोवऱ्यात सापडत आहेत. अशा परिस्थितीत, कोरोनाच्या कहरमुळे चित्रपटसृष्टीचा वेग पुन्हा मंदावला आहे. बर्‍याच राज्यात शूटिंगवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. अशा परिस्थितीत दैनंदिन मजुरी कामगारांना पुन्हा एकदा आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

दैनंदिन कामगारांना पुन्हा एकदा आपल्या रोजीरोटीसाठी संघर्ष करावा लागत आहे. परंतु बॉलिवूड अभिनेता सलमान खानने या मजुरांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. सलमान खान स्पॉटबॉय, तंत्रज्ञ, मेकअप आर्टिस्ट, स्टंटमॅन यांच्यासारख्या २५ हजार दैनंदिन वेतन कामगारांना मदत करणार आहे.

FWICE च्या अध्यक्षांनी केली पुष्टी
फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज (FWICE) चे अध्यक्ष बीएन तिवारी यांनी स्वतः या बातमीची पुष्टी केली आहे. वृत्त संस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले की, “आम्ही सलमान खान यांना गरजू लोकांची यादी पाठवली होती आणि त्यानंतर त्यांनी आर्थिक मदत करण्याचे मान्य केले.” त्या वृत्तानुसार सलमान खान सुमारे २५ हजार कामगारांच्या खात्यात थेट १५०० रुपये जमा करणार आहे.

‘राधे’द्वारेही दिले जातील पैसे
सर्वांना माहित आहे की, सलमान खानचा आगामी चित्रपट ‘राधे: योर मोस्ट वाँटेड भाई’ ईदच्या निमित्ताने १३ मे रोजी रिलीझ होणार आहे. चाहते या चित्रपटाची बरीच प्रतीक्षा करत आहेत. अशा परिस्थितीत सलमान, ‘राधे’च्या कमाईतील काही भाग देशात कार्यरत ऑक्सिजन सिलिंडर्स, कंसंट्रेटर्स आणि व्हेंटिलेटरच्या कमतरतेवर मात करण्यासाठी देणार आहे. असे म्हटले जात आहे की, सलमान आणि झी एंटरटेनमेंट यांनी एकत्रितपणे हा निर्णय घेतला आहे. या आधी सलमानने गरजूंमध्ये भोजन वाटप केले होते. सलमान सातत्याने लोकांना वेगवेगळ्या प्रकारे मदत करत आहे.

यशराज प्रोडक्शनची मदत
FWICE चे अध्यक्ष बीएन तिवारी यांनी वृत्त संस्थेला दिलेल्या मुलाखतीत अशी ही माहिती दिली आहे की, यशराज प्रोडक्शन देखील गरजूंच्या मदतीसाठी पुढे आले आहे. त्यांनाही मदतीसाठी गरजू ज्येष्ठ नागरिकांची यादी पाठविली गेली व त्यांनीही मदतीसाठी सहमती दर्शविली. आजकल सर्व सेलेब्रिटी आपापल्यापरीने मदत करताना दिसत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-डॉक्टरांना ‘सैतान’ म्हणणे सुनील पालला पडले भलतेच महागात! कॉमेडियन विरोधात एफआयआर दाखल

-‘अंदाज अपना अपना’ चित्रपटादरम्यान ‘या’ कारणामुळे आमिर खानला आवडत नव्हता सलमान खान; नंतर बनले जिगरी मित्र

-काय आहे प्रियांकाच्या सौंदर्य आणि तंदुरुस्तीचे गुपीत? वाचून तुम्हीही कराल स्वतःमध्ये बदल


Leave A Reply

Your email address will not be published.