Monday, March 4, 2024

अरबाज खानच्या दुसऱ्या लग्नावर सलमान खानने पहिल्यांदा दिली प्रतिक्रिया; म्हणाला’ ‘तो माझे ऐकत नाही…’

सलमान खानचा (Salman khan) वादग्रस्त शो ‘बिग बॉस 17’चा ग्रँड फिनाले झाला. यावेळी मंचावर अनेक स्टार्सनी आपली उपस्थिती लावली. या स्टार्समध्ये सलमान खानचा धाकटा भाऊ अरबाज खानचाही समावेश होता. ‘बिग बॉस’च्या या सीझनच्या अनेक एपिसोडमध्ये अरबाज आणि सोहेल देखील स्पर्धकांसोबत मस्ती करताना दिसले. अरबाज आणि सलमान जेव्हा स्टेजवर एकत्र आले तेव्हा काहीतरी घडलं, ज्याची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.

अभिनेता अरबाज खान (Arbaaz Khan) सध्या बॉलिवूडमध्ये चर्चेत आहे. 24 डिसेंबर 2023 रोजी त्याने त्याची गर्लफ्रेंड शूरा खानसोबत दुसरे लग्न केले. काल रात्री तो ‘बिग बॉस’च्या फिनालेमध्ये आला तेव्हा त्याच्या एन्ट्रीवर लग्नाशी संबंधित एक गाणं वाजवण्यात आलं. गाणे संपल्यानंतर अरबाज लाजून म्हणाला, ‘अहो, तुम्ही लोक असा वागत आहात की जणू मी लग्न करणारा पहिला आहे.’

‘बिग बॉस 17’ च्या फिनालेमध्ये जेव्हा सलमान आणि अरबाज स्टेजवर उपस्थित होते, तेव्हा कॉमेडियन भारती सिंगही स्टेजवर आली होती. भारती येताच ती अरबाजला तिच्या ओळखीच्या स्टाईलमध्ये म्हणाली, ‘तू मला तुझ्या लग्नाला का नाही बोलावलं.’ भारतीचा प्रश्न ऐकून अरबाज हसत हसत म्हणाला, ‘पुढच्या लग्नाला मला कोणी आमंत्रित करणार नाही, हो दुसऱ्याच्या…!’

‘बिग बॉस 17’ च्या मंचावर कॉमेडियन भारती सिंगने (Bharti singh) अरबाजसोबत मस्ती तर केलीच पण सलमान खानची छेड काढतानाही दिसली. भारतीने सलमानला विचारले, ‘जेव्हा अरबाजने तुला सांगितले की तो पुन्हा लग्न करू इच्छितो, तेव्हा मोठा भाऊ असल्याने तू अरबाजला कोणताही सल्ला दिला नाहीस.’ यावर सलमान हसला आणि म्हणाला, ‘अरबाज कोणाचेही ऐकत नाही, त्याने ऐकले असते तर…’ सलमानने जाणूनबुजून त्याचे उत्तर अपूर्ण ठेवले. सलमान खानचे हे वक्तव्य सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

काय लका मोठी संधी हुकवली ! महेश बाबूने राजामौलीच्या ‘या’ चित्रपटात केले फुकटात काम
‘आहे दम तुझ्या पार्श्वभागात?…’ ‘या’ कारणामुळे किरण मानेंनी दिले पुष्कर जोगला खुले आव्हान

हे देखील वाचा