Saturday, November 23, 2024
Home कॅलेंडर पनवेल फार्महाऊस प्रकरण सलमान खानच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने फेटाळले भाईजानचे आरोप

पनवेल फार्महाऊस प्रकरण सलमान खानच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने फेटाळले भाईजानचे आरोप

अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि वाद हे प्रकरण काही नवीन नाही. आपल्या दमदार अभिनयाने बॉलिवूडमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळवलेला अभिनेता सलमान खान नेहमीच कोणत्या ना कोणत्या वादामुळे चर्चेत असतो. काळवीट प्रकरण आणि हिट अँड रन केस प्रकरणात चांगलाच अडकलेला भाईजान सध्या त्याच्या पनवेलमधील फार्महाऊस शेजारच्या शेतकऱ्यामुळे चांगलाच अडचणीत आला आहे. या व्यक्तीविरुद्ध मानहानीचा दावा केलेला सलमान खान आता स्वतः अडचणीत आला आहे. काय आहे हे संपुर्ण प्रकरण चला जाणून घेऊ. 

याबाबत संपुर्ण माहिती अशी की, अभिनेता सलमान खानच्या पनवेलमधील फार्महाऊस बद्दलचा वाद अनेक दिवस चर्चेत आहे. या प्रकरणाची सुरूवात केतन कक्कड नावाच्या व्यक्तीने सलमान खानविरुद्ध त्याची जमीन बळकावल्याच्या आरोपापासून झाली होती. या आरोपाविरुद्ध सलमान खानने मानहानीचा दावा केला होता. मात्र हा दावा कोर्टाने फेटाळल्याने सलमान खानच्या अडचणी वाढल्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. यावर मुंबई कोर्टाने सलमान खानविरुद्ध केलेले आरोप खरे असल्याचे म्हणले आहे. तर सलमान खानच्या मानहानीच्या दाव्यावरही महत्वाचा निर्णय दिला आहे.

यावर निर्णय देताना मुंबई न्यायालयाचे न्यायाधीश, ए.एच लद्दाद यांनी, “माझ्या मते सलमान खानने केतन कक्कड विरोधात केलेले आरोप कसे खरे आहेत हे त्यांना सिद्ध करण्यात त्याला यश आलेले नाही. त्यामुळे हे सगळे आरोप फेटाळून लावत आहोत.” तसेच केतन कक्कडने सलमान खानविरोधात ज्या जमिनीमध्ये येण्यापासून विरोध करत असल्याचे आरोप केले होते त्याचे त्यांच्याकडे कायदेशीर पुरावे असल्याचेही मत कोर्टाने मांडले आहे. त्यामुळे सलमान खान चांगलाच अडचणीत आला आहे. त्याचप्रमाणे सलमान खानने या केतन कक्कड आणि इतर व्यक्तींना त्याच्या विरोधात कोणतेही अपमानास्पद विधान न करण्याचा आदेश द्यावा अशी मागणी केली होती. कारण हे सगळे आरोप फक्त बदनामी करण्यासाठी केल्याचे सलमानने सांगितले होते.

केतन कक्कडच्या वकिलांचे म्हणणे आहे की “त्यांची जमीन सलमान खानच्या पनवेल फार्महाऊसजवळ आहे, ज्याला अभिनेत्याने लोखंडी गेटने अडवले आहे. निवृत्तीनंतर केतन भारतात परत आला तेव्हा सलमान खान आणि त्याच्या कुटुंबाला आपल्या जमिनीचा वापर करता आला नाही.” केतनच्या वकिलाने असेही सांगितले की, सलमान याआधी कक्कडला चर्चेसाठी बोलवायचा आणि त्या बदल्यात त्याची जमीन वापरायचा.” त्याचवेळी, केतनच्या वकिलाने न्यायालयात युक्तिवाद केला होता की, त्याला त्याच्या मंदिरात जाण्याचा अधिकारही देण्यात आलेला नाही. त्यांना वीजही देण्यात आली नाही. त्यांनी आपल्या तक्रारीसाठी वनविभागाला सर्व विभागांशी संपर्क साधला आहे. तक्रार आणि एफआयआरही दाखल करून योग्य तपास सुरू केला. या प्रकरणाशी संबंधित सर्व न्यायालयांमध्ये खटलेही प्रलंबित असल्याचे वकिलाने सांगितले. या सगळ्या प्रकरणामुळे सलमान खान आता चांगलाच अडचणीत आल्याची चर्चा सुरू झाली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा –

दिवसेंदिवस अधिकच ग्लॅमरस होत चाललीये नुसरत भरुचा

फोटोमधील ‘या’ अभिनेत्रीला ओळखले का? मराठी मनोरंजन मिरवतीये अभिनयाचा डंका

इटलीच्या अडल्टस्टारची प्रियकराने शरीराचे तुकडे करून केली निर्घृण हत्या, घटनाक्रम ऐकूण उडेल थरकाप

 

 

author avatar
Chinmay Remane

हे देखील वाचा