Saturday, June 15, 2024

पोस्टरला दुधाने अभिषेक केल्यामुळे सलमान खान झाला नाराज, सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करत लिहिले,…

हिंदी चित्रपटसृष्टीत आजच्या घडीला किंवा आधीच्या काळात अनेक सुपरस्टार होऊन गेले. ज्यांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. मात्र असे असूनही कोणालाही एक प्रश्न विचारला की, इंडस्ट्रीमधील सर्वात मोठा सुपरस्टार कोण? यावर सगळेच एकच नाव घेतील आणि ते म्हणजे सलमान खान. सलमानने त्याच्या अभिनयाने आणि त्याच्या व्यक्तिमत्वाने सर्वांच्याच मनावर गारुड घातले आहे. सलमानचा सिनेमा म्हणजे त्याच्या चाहत्यांसाठी एक पर्वणीच असते, आणि त्याचा सिनेमा म्हटल्यावर तो हिट होणारच हे सर्वांना आधीपासूनच माहित असते. दबंग ३ नंतर सलमानचा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेला सिनेमा म्हणजे ‘अंतिम द फायनल ट्रुथ’ नुकताच हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे.

प्रेक्षकांसाठी आणि खासकरून त्याच्या फॅन्ससाठी हा सिनेमा म्हणजे कोणत्याही मोठ्या गिफ्टपेक्षा कमी नाही. सिनेमाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. सलमानचे फॅन्स वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचे सलमानबद्दलचे प्रेम व्यक्त करताना दिसत असून, याचे विविध व्हिडिओ सध्या सोसहल मीडियावर व्हायरल होत आहे. यातल्याच एका व्हिडिओमध्ये सलमानचे चाहते त्याच्या पोस्टरला दुधाचाच अभिषेक करताना दिसत आहे. हा व्हिडिओ सलमानने स्वतः त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे.

सलमानने हा व्हिडिओ शेअर करताना लिहिले, “अनेकांच्या नशिबात पाणी देखील नसते आणि तुम्ही अशाप्रकारे दूध वाया घालवत आहात. मी तुम्हाला विनंती करतो की, तुम्ही हे दूध गरिबांना द्या. ज्यांना दूध प्यायला मिळत नाही.”

याआधी सलमानच्या चाहत्यांनी चक्क चित्रपटगृहांमध्ये एके फोडल्याचे व्हिडिओ देखील व्हायरल झाले होते. तेव्हा सलमानने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत फॅन्सला असे करण्यास मनाई केली होती. सोबतच चित्रपटगृहाच्या मालकांना देखील प्रेक्षकांना फटाके नेण्यास मज्जाव करा असे आवाहन केले होते. अशा कृतीमुळे मोठी दुर्घटना घडू शकते असे सुद्धा त्याने सांगितले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मी या चित्रपटासाठी आपले रक्त दिलंय’, म्हणत शाहिदने सांगितला ‘जर्सी’ चित्रपटादरम्यानचा वाईट किस्सा

-नेपोटिझमबाबत आयुष शर्माने मांडले मत; सलमान, शाहरुखचा उल्लेख करत म्हणाला, ‘प्रत्येक अभिनेता स्वार्थी…’

-काय सांगता! जॅकलिन फर्नांडिस आहे २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपीसोबत रिलेशनशिपमध्ये?

हे देखील वाचा