Friday, December 8, 2023

लहान भावाला रक्तबंबाळ झालेला पाहून पळून गेला होता सलमान खान, वाचा संपूर्ण प्रकरण

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) त्याच्या कुटुंबावर खूप प्रेम करतो. तो सोहेल खान (Sohail Khan) आणि अरबाज खानवर (Arbaaz Khan) जीव ओवाळून टाकतो. कित्येकदा या तिघांची जबरदस्त बॉण्डिंग पाहायला मिळाली आहे. सोहेल खानने सलमान खानच्या अनेक चित्रपटांची निर्मिती केली असून, सलमानच्या चित्रपटांचे दिग्दर्शनही केले आहे. पण एकदा असं काही घडले की सोहेल ला रक्ताने माखलेला पाहून सलमान आणि अरबाज त्याला सोडून पळून गेले होते.

सलमान खानने २०१९ मध्ये हा किस्सा ‘द कपिल शर्मा शो’मध्ये सांगितला होता. त्याने सांगितले की, “आम्ही तिघे ‘टार्झन’ हा चित्रपट बघत होतो आणि दगडांशी खेळत होतो. त्यावेळी मी खेळ खेळण्यात इतका मग्न होतो की, मी नकळत सोहेलवर दगड फेकला. त्यावेळेस सोहेल खूप लहान होता. तो कचऱ्याच्या डब्यामागे गेला आणि काही वेळानंतर तो उभा राहिला, तेव्हा तो खूप रडत होता आणि त्याला खूप लागले होते. रक्त देखील येत होते. त्यावेळी ते पाहुन अरबाज आणि मी खूप घाबरलो आणि तिथून पळून गेलो.”

सोहेल खानने बॉलिवूड इंडस्ट्रीत दिग्दर्शक म्हणून सुरूवात केली होती. त्याने ‘औजार’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले, ज्यात सलमान खान मुख्य भूमिकेत होता. त्यानंतर त्याने ‘प्यार किया तो डरना क्या’ या चित्रपटाचे देखील दिग्दर्शन केले. तो लेखक देखील आहे. सोहेल खानने ‘मैने दिल तुझको दिया’ या चित्रपटाद्वारे अभिनयाला सुरुवात केली. या चित्रपटाचा दिग्दर्शक देखील तोच होता.

सलमान खान आणि सोहेल खानने अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. ‘मैने प्यार क्यूं किया’मध्ये त्याने सलमान खानसोबत काम केले होते. नंतर ‘वीर’ आणि ‘ट्यूबलाइट’ या चित्रपटांमध्ये देखील त्यांनी एकत्र काम केले आहे. बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरलेल्या सलमान खानच्या ‘जय हो’ या चित्रपटाचे दिग्दर्शन सोहेल खानने केले होते. गेल्या काही काळापासून तो बॉलिवूडसृष्टीपासून दूर आहे.

हेही वाचा-

हे देखील वाचा