Saturday, June 29, 2024

सलमान खानचा नवा लूक व्हायरल; शाहरूख खान म्हणला, ‘माझ्यावरचं प्रेम दाखवण्यासाठी…’

गेल्या काही दिवसांपासून शाहरूख खानच्या ‘जवान‘ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याकडे चाहते डोळे लावून बसले आहेत. इतकचं नाही तर काही दिवसांपूर्वी शाहरूखचा ‘जवान’ चित्रपटातील लूक सुद्ध समोर आला आहे. जो सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला. त्या फोटोच शाहरूख खानने टक्कल केलेला दिसत आहे. यादरम्यान आता सलमान खानच्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे.

बॉलिवूडचा दंबग म्हणून सलामान खानला (Salman Khan) ओळखले जाते. त्याने बाॅलिवूडमधील नुकतीच 35 वर्षे पूर्ण केली आहेत. सलमान खान सध्या त्याच्या लूकमुळे चर्चेचा विषय आहे. काही दिवसांपूर्वी सलमानचा एक व्हिडिओ समोर आला होता. जो चांगलाच चर्चेत आला आहे. ज्यामध्ये तो टक्कल आणि ब्लॅक शर्ट लूकमध्ये दिसला होता, हे पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले होते. दरम्यान, आता पुन्हा एकदा भाईजानचा आणखी एक लेटेस्ट व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो आपल्या दबंग स्टाईलने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

सोमवारी( 28ऑगस्ट) रात्री उशिरा सलमान खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सलमानने टक्कल केलेले दिसत आहे. ‘टायगर 3’चे उर्वरित शूट सलमान करत असल्याचे बोलले जात आहे. यादरम्यान सलमानची दबंग स्टाइल नजरेसमोर येत आहे. भाईजानचे चाहते त्याच्या या व्हिडिओला प्रचंड लाइक आणि कमेंट करत आहेत. तर काही लोकांनी या व्हिडिओचा संबंध थेट शाहरूखच्या चित्रपटाशी लावला आहे.

त्याचवेळा एका चाहत्याने शाहरूखला विचारले की, सलमान खान टक्कल पडलेल्या लूकमध्ये जवान चित्रपटाचे प्रमोशन करत आहे का? या चाहत्याच्या प्रश्नाला शाहरुखने अतिशय मजेशीर पद्धतीने उत्तर दिले. तो म्हणाला, “सलमान भाऊला माझ्यावर प्रेम दाखवण्यासाठी कुठलाही लुक देण्याची गरज नाही… तो नेहमी माझ्यावर मनापासून प्रेम करतो.” (Salman Khan new look viral Shah Rukh Khan said)

अधिक वाचा-
“तिच्या पायाला महिनाभर प्लास्टर…”, मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रीच्या लेकीला गंभीर दुखापत
जमलं रे जमलं! मराठी सिनेसष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे अडकणार विवाह बंधनात; पाहा फोटो

हे देखील वाचा