Monday, September 25, 2023

“तिच्या पायाला महिनाभर प्लास्टर…”, मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रीच्या लेकीला गंभीर दुखापत

अनेक सेलिब्रेटांच्या खाजगी आयुष्यातील घडामोडी जाणून घेण्याची इच्छा चाहत्यांना असते. त्यामुळे सेलिब्रेटी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी शेअर करत असतात. प्रसिद्ध अभिनेत्री क्रांती रेडकर देखील सोशल मीडियावर सक्रिय असते. ती सर्वाधिक चर्चेत आली ती ‘कोंबडी पळाली’ या गाण्यावर परफॉर्मन्स करून. तिच्या अभिनयाने आणि डान्सने ती आज महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली आहे. पण क्रांतीच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे.

क्रांतीने (Kranti Redkar) सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिच्या दोन्हीही मुली झिया आणि झायदा दिसत आहेत. या व्हिडीओत झायदा ही झियाला चालण्यासाठी मदत करत आहे. यावेळी क्रांतीने त्यांच्या शाळेत घडलेला एक किस्साही सांगितला आहे.

तिने पोस्ट करताना लिहिले की, “माझी मुलगी झिया हिला दुखापत झाल्याने तिच्या पायाला महिनाभर प्लास्टर करण्यात आलं होतं. आता ते काढलं आहे. ती अजूनही चालायला शिकत आहे. ती खूपच धाडसी, संयमी आणि समजूतदार आहे. पण इथे आमची खरी हिरो ही मिस छबिल वानखेडे आहे, जी सावलीसारखी तिच्या पाठीशी उभी आहे.

आम्ही ओपन हाऊससाठी शाळेत गेलो होतो, तेव्हा मला शाळेतील कर्मचारी सांगत होते की, “झायदा किती करते झियासाठी. ती तिची काळजी घेते. तिच्या बॅगेतून पुस्तक काढते. पुन्हा ती भरुनही ठेवते. जर ती वॉशरुमला गेली असेल तर ती बाहेर येईपर्यंत थांबते. तिचा टिफीन उघडून देते. झियाच्या पायाला प्लास्टर होते. पण असे असताना झायदा मात्र तिला प्रत्येक कामात मदत करत होती.”

आपण ओपन हाऊस झाल्यानंतर घरी आलो आणि आम्ही सर्वांनी दोन्ही मुलींसाठी उभे राहून टाळ्या वाजवत त्यांचे कौतुक केले. या कठीण काळात आम्हाला आनंदाने पुढे जाण्यासाठी दिलेल्या सर्व शक्तीसाठी मी देवाचे आभार मानते”, असे क्रांती रेडकरने सांगितले आहे.

 क्रांती रेडकर विषयी बोलायचं झाले, तर तिने 2000 साली ‘सून असावी अशी’ या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने ‘किडनॅप गर्ल’, ‘गंगाजल’ या हिंदी चित्रपटात काम केले. परंतु तिच्या ‘कोंबडी पळाली’ या गाण्याने तिला सर्वत्र ओळख मिळाली. हे गाणे ‘जत्रा’ या चित्रपटातील आहे. (Actress Kranti Redkar daughter suffered a serious leg injury)

अधिक वाचा-
भारतातच नाही, तर ‘गदर 2’चा डंका जगभरात; 18 दिवसांनंतर केली ‘छप्परफाड’ कमाई
प्रतीक्षा संपली! ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार शाहरुख खानच्या ‘जवान’चा ट्रेलर, अभिनेत्याने केला खुलासा

हे देखील वाचा