काय होते सलमान आणि शाहरुख खानच्या भांडणाचे खरे कारण?, स्वत: दोघांनीच केला होता खुलासा


बॉलिवूडमध्ये अनेक मोठमोठे कलाकार आहेत. ज्यांनी अनेक हिट सिनेमे देत प्रचंड लोकप्रियता मिळवली. मात्र, तीन खान मंडळींचे जो दबदबा इंडस्ट्रीमध्ये आहे, त्याला कोणतीच तोड नाही. सलमान, आमिर आणि शाहरुख या तीन खानची प्रचंड क्रेझ चाहत्यांमध्ये दिसून येते. या तिघांनाही जबरदस्त फॅन फॉलोविंग आहे. मात्र, याच त्रिकुटांपैकी सलमान आणि शाहरुख खान हे दोघे एकमेकांचे चांगले मित्र आहेत. त्यांचे २००८ साली कॅटरिना कैफच्या वाढदिवसाच्या पार्टीत जोरदार भांडण झाले होते. त्यांचे भांडण अनेक वर्ष मीडिया आणि चाहत्यांमध्ये खूप रंगले होते.

मात्र, या दोघांचे भांडण कशावरून झाले याचे खरे कारण कधीच लोकांसमोर आले नाही. यांच्या भांडणाचे प्रत्येकाने वेगवेगळे कारणं सांगितले. पण या दोघांपैकी कोणीच मीडियासमोर त्यांच्या वादाचे खरे कारणं सांगितले नाही. पण २०१६ साली भांडणाच्या ८ वर्षांनी या दोघांनी एका पुरस्कार सोहळ्यामध्ये त्यांच्या भांडणाचे खरे कारण सांगितले होते.

स्टार स्क्रीन पुरस्कार सोहळ्याच्या दरम्यान हे दोघं सोबतच स्टेजवर आले. यावेळी शाहरुख म्हणाला, “सर्वांनाच आमच्या भांडणाबद्दल माहित होते. मात्र, ते कशावरून झाले, त्याचे खरे कारण कोणालाच माहित नाही. आमच्यात जे भांडण झाले ते अतिशय छोट्या कारणावरून झाले.”

पुढे सलमान म्हणाला, “शाहरुख मला लग्नासाठी तयार करत होता. शाहरुख मला म्हणाला होता की, मी घरी जातो, तेव्हा मला खूप आनंद होतो. घरी बायको असते म्हणून खूप आनंद होतो. त्यावर मी त्याला म्हणालो, मी घरी जातो तेव्हा माझी बायको नसल्याने मला जास्त आनंद होतो.”

पुढे सलमान म्हणाला, “शाहरुख म्हणतो, मी घरी जातो, तेव्हा माझी लाडकी माझ्या मांडीवर येऊन बसते. त्यावर मी त्याला म्हणालो, मी घरी जातो तेव्हा अनेक लाडक्या माझ्या मांडीवर बसतात. बस यावरूनच आमच्यात वाद झाला होता.”

या दोघाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले, तर सलमान शाहरुखच्या ‘पठाण’ सिनेमात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात शाहरुखसोबत दीपिका पादुकोण आणि जॉन मुख्य भूमिकेत आहेत. सलामानचा ‘राधे’ सिनेमा आताच प्रदर्शित झाला असून, याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम अक्षयाची ऑनस्क्रीन सासूसोबत आहे खास मैत्री; भावना व्यक्त करत म्हणाली…

-आमिर खानच्या ‘या’ चित्रपटात झळकली होती कपिल शर्माची ‘ऑनस्क्रीन’ पत्नी सुमोना चक्रवर्ती; आज आहे कोट्यवधी संपत्तीची मालकीण

-कपूर खानदानाप्रमाणेच धर्मेंद्र यांचाही होता मुलीच्या डान्स आणि चित्रपटात काम करण्याला विरोध; ‘अशाप्रकारे’ झाले तयार


Leave A Reply

Your email address will not be published.