Monday, June 24, 2024

जेव्हा सलमान खान पुसायचा आदित्य नारायणचे नाक, स्टेजवर ‘तो’ किस्सा ऐकून प्रेक्षकही झाले लोटपोट

आजकाल सलमान खान त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘अंतिम: द फायनल ट्रुथ’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यासाठी तो अनेक रियॅलिटी शोमध्ये भाग घेत आहे. या दरम्यान, तो अलीकडेच ‘सारेगमपा २०२१’ या म्युझिक रियॅलिटी शोमध्ये पोहोचला. जिथे त्याने सर्व स्पर्धकांच्या परफॉर्मन्सचा आनंद घेतला, तसेच अनेक मजेदार किस्से देखील सांगितले. असाच एक किस्सा आदित्य नारायण याच्याशी संबंधित आहे, जो आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

आदित्य नारायणशी संबंधित किस्सा सांगताना सलमान खान म्हणाला, “आदित्य जेव्हा तीन-चार वर्षांचा होता, तेव्हा मी त्याच्यासोबत काम केलं. ‘जब प्यार किसी से होता है’साठी आम्ही शूटिंग केलं होतं. आदित्य लहान असताना मी त्याचे नाक पुसायचो.” यानंतर आदित्य म्हणाला, “माझे नाक नेहमीच वाहायचे आणि मला मदत करण्यात सलमान नेहमीच पुढे असायचा. पण आता बघा मी किती मोठा झालो आहे, पण सलमान भाई अजूनही तसाच तरुण, डॅशिंग माणूस आहे.” सलमान आणि आदित्यच्या या संवादाने प्रेक्षकांना खूप हसवले. (salman khan recalls working with aditya narayan said used to wipe his nose)

बालपणी आदित्यने ‘रंगीला’, ‘परदेस’ आणि ‘जब प्यार किसी से होता है’ या चित्रपटांमध्ये बालकलाकाराची भूमिका साकारली होती. त्याने सलमान खानसह, तसेच अनेक बड्या कलाकारांसोबत काम केले आहे. आदित्य लहानपणापासूनच एक चांगला गायक आहे आणि मोठा झाल्यावरही त्याने अभिनयापेक्षा गाण्याला महत्त्व दिले.

तसेच, सलमानबद्दल सांगायचे झाले, तर तो नुकताच ‘अंतिम: द फायनल ट्रुथ’मध्ये आयुष शर्मा, महिमा मकवाना, महेश मांजरेकर यांच्यासोबत दिसला. चित्रपटात सलमान पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहे, तर आयुषला गँगस्टरच्या भूमिकेत चांगलीच पसंती मिळत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मी या चित्रपटासाठी आपले रक्त दिलंय’, म्हणत शाहिदने सांगितला ‘जर्सी’ चित्रपटादरम्यानचा वाईट किस्सा

-नेपोटिझमबाबत आयुष शर्माने मांडले मत; सलमान, शाहरुखचा उल्लेख करत म्हणाला, ‘प्रत्येक अभिनेता स्वार्थी…’

-काय सांगता! जॅकलिन फर्नांडिस आहे २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपीसोबत रिलेशनशिपमध्ये?

हे देखील वाचा