Friday, July 12, 2024

सलमान खानने सुरू केले ‘सिकंदर’ चित्रपटाचे शूटिंग, सेटवरून अभिनेत्याचा फोटो व्हायरल

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) सध्या त्याच्या आगामी ‘सिकंदर’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात अभिनेत्यासोबत रश्मिका मंदान्ना दिसणार आहे. 2025 च्या ईदला सलमान त्याच्या चाहत्यांना गिफ्ट देण्यासाठी सज्ज झाला आहे. पुढील वर्षी ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अशा परिस्थितीत या अभिनेत्याने सोमवारपासून चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. आज, बुधवार, १९ जून रोजी त्यांनी चित्रपटाच्या सेटवरील एक फोटो सोशल मीडियावर शेअर करून ही माहिती दिली आहे.

सलमान खानने त्याच्या एक्स अकाऊंटवर (पूर्वीचे ट्विटर) ‘सिकंदर’च्या टीमसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत अभिनेत्यासोबत साजिद नाडियादवाला आणि दिग्दर्शक ए.आर. मुरुगदास दिसत आहेत. ‘सिकंदर’चा फर्स्ट लूक पाहून सलमान खानचे चाहते खूप उत्साहित झाले आहेत. या फोटोमध्ये सलमान एका नव्या लूकमध्ये दिसत आहे. त्याचा डॅशिंग लूक पाहून चाहते त्याचे कौतुक केल्याशिवाय राहवत नाहीत.

भाईजानने सोशल मीडियावर फोटो शेअर करत लिहिले, ‘टीम सिकंदरसोबत 2025 ईदची वाट पाहत आहोत.’ पोस्ट शेअर करताना, त्याने साजिद नाडियादवाला, दिग्दर्शक एआर मुरुगदास आणि चित्रपटाची मुख्य अभिनेत्री रश्मिका मंदान्ना यांना टॅग केले आहे. ‘सिकंदर’च्या सेटवरून सलमानचा फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. सलमानसोबत त्याचे चाहतेही 2025 च्या ईदची आतुरतेने वाट पाहत आहेत. 18 जूनपासून या चित्रपटाचे शूटिंग सुरू करणार असल्याची घोषणा सलमानने काही काळापूर्वी केली होती.

‘सिकंदर’चे दिग्दर्शन एआर मुरुगदास करत आहेत. रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटात सलमान जबरदस्त ॲक्शन करताना दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की शूटिंग सुरू केल्यानंतर पहिला ॲक्शन सीन हवेत शूट केला जाईल. या चित्रपटात सलमान खानसोबत रश्मिका मंदान्नाही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात दोघेही पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियादवाला करत आहेत. पुढच्या वर्षी ईदला तो चित्रपटगृहात दाखल होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

सोनाक्षीच्या लग्नावर संपूर्ण कुटुंब नाराज; आईने उठवले हे मोठे पाऊल
श्रद्धाने राहुल मोदींसोबतच्या नात्याची केली पुष्टी! सोशल मीडिया पोस्ट जोरदार व्हायरल

हे देखील वाचा