Monday, July 1, 2024

अर्चना गाैतमने बिग बाॅसला चांगलेच धमकावले; म्हणाली, ‘आता अती हाेतंय’

छाेट्या पडद्यावरील लाेकप्रिय शाे ‘बिग बॉस 16’मध्ये, होस्ट सलमान खान याने साजिद खान आणि अर्चना गाैतम यांना फटकारले. अर्चनाला निदान थोडी तरी बुद्धी येईल असे वाटत होते, पण तिला कितीही फटकारले तरी, काही वेळाने तिची अवस्था पूर्वीसारखी होते. असं सनामान म्हणाला. शोच्या नवीन प्रोमोमध्ये असे दिसून येत आहे की, अर्चना आता बिग बॉसला धमकावत आहे आणि दिलेले टास्क करण्यास नकार देत आहे. ‘बिग बॉस तुमची खूप जास्त होत आहे’ असं म्हणताना देखील अर्चना दिसत आहे.

अलीकडेच अनेक स्पर्धकांनी घरातील नियम तोडल्यानंतर, बिग बॉसने घरातील सदस्यांना त्यांच्यावर थंड पाणी शिंपडायला सांगितले. प्रियंका (Priyanka Chahar Choudhary)ही शिक्षा पूर्ण करताना दिसली, पण अर्चना (archana gautam) शपथ घेत आहे की, ती दररोज घरात काहीतरी गोंधळ घालेल आणि अर्चनाने टास्क करण्यास स्पष्टपणे नकार दिला. यावर निमृतने सांगितले की,  “तुम्ही व्हीआयपी नाही आहात आणि तुम्ही नियमांचे पालन केले पाहिजे.”

यावर उत्तर देताना अर्चना म्हणाली, “मला थंड पाणी जमणार नाही, मी आजारी पडेन.. मी नियम पाळणार नाही.” मात्र, यानंतर अर्चनाने आपला संयम गमावला आणि बिग बॉसला म्हणाली, “तुमची खूप जास्त हाेत आहे.” यावर घरातील सदस्यांनी अर्चनाला शांत केले आणि तिला शिक्षेला सामोरे जाण्यास सांगितले, पण ती मान्य झाली नाही. यानंतर बिग बॉसने एक घोषणा केली आणि अर्चनामुळे संपूर्ण घराला शिक्षा करणार असल्याचे सांगितले. अशाप्रकारे अर्चना पुन्हा एकदा घरातील सदस्यांच्या निशाण्यावर आली.

मागील एपिसोडमध्ये सुंबुलचे वडील, टीनाची आई आणि शालीनचे आई-वडील शोमध्ये दिसले होते आणि त्यांच्यात जोरदार वाद झाला होता. त्यांनी सुंबुलच्या वडिलांचे त्यांच्या मुलीशी केलेले संभाषण आणि टीना व शालीन यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल सांगितले. याशिवाय फहमन खानही त्याच्या आगामी शोच्या प्रमोशनसाठी शोमध्ये आला होता. (salman khan show contestants archana gautam openly threatened bigg boss says aapka bhi ab jyada ho raha hai)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अय्याे! अमिताभ बच्चन यांनी चक्क वडिलांना विचारला हाेता प्रश्न, ‘मला का जन्माला घातले?’

एवढा होता अमिताभ बच्चन यांचा पहिला पगार, वडिलांसाठी घेतलेली ‘ही’ वस्तू

हे देखील वाचा