Tuesday, May 28, 2024

‘काम देण्याच्या नावाखाली अश्लील मागणी’, साजिद खानवर आणखी एका अभिनेत्रीचा गंभीर आरोप

बाॅलिवूड चित्रपट निर्माता साजिद खानबिग बॉस 16‘ मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला आहे. शोमध्ये त्याचा गेम प्लॅन पसंत केला जात आहे. मात्र, शोच्या बाहेर त्याच्यावर बरीच टीका होत आहे. ही टीका त्याच्यावर शोमधील एन्ट्रीपासून सुरू झाली. #MeToo चळवळीदरम्यान अनेक महिलांनी त्यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. राष्ट्रीय महिला आयोगाच्या प्रमुख स्वाती मालीवाल यांच्यासह अनेक महिला कार्यकर्त्यांनी शोमध्ये त्याच्या प्रवेशावर आक्षेप घेतला आहे.

‘बिग बाॅस 16’ च्या घरात असणाऱ्या साजिद खान (Sajid Khan) याच्यावर आरोप करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. नम्रता शर्मा सिंग (Namrata Sharma Singh) या मॉडेलने साजिदवर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. अशातच आता अभिनेत्री शीला प्रिया सेठ (Sheelia Priya Seth) हिने साजिदवर गंभीर आरोप केला आहे. प्रियाने 14 वर्षे जुन्या प्रकरणाचा खुलासा केला आहे.

माध्यमातील वृत्तानुसार, शीला प्रिया सेठ म्हणाली, “मी पहिल्यांदा 2008 मध्ये दिग्दर्शक साजिद खानला भेटले होते. मग मी त्याला त्याच्या आगामी प्रोजेक्टमध्ये मला कास्ट करण्याची विनंती केली. मात्र, मी त्याच्या काही कृत्यांमुळे हैराण झाली आणि मागे हटली.”  अभिनेत्रीने म्हणाली, “साजिद जवळपास 5 मिनिटे माझ्या प्रायव्हेट पार्टकडे पाहत राहिला.”

शीला प्रिया सेठने पुढे सांगितले की, “साजिदने तिला सांगितले की, ‘तिच्या स्तनाचा आकार बॉलिवूडसाठी मोठा नसल्यानं तिने शस्त्रक्रिया करावी.’ त्याने माझे स्तन मोठे करण्यासाठी काही तेल वापरावे आणि मी बेस्टला रोज मसाज करावी, तरच मला बॉलिवूडमध्ये काम मिळू शकेल.” असे शीला हिने सांगितले.

साजिद खान ‘बिग बॉस 16’ मध्ये गेल्यानंतर शर्लिन चोप्राने मीडियासमोर आरोपांची पुनरावृत्ती केली. शर्लिन व्यतिरिक्त साजिदवर सलोनी चोप्रा, मंदाना करीमी, अहाना कुमार, रेचेल व्हाईटसह अनेक अभिनेत्री आणि मॉडेल्सनी आरोप केले होते. (bollywood sajid khan sexual assaulted another actress sheelia priya seth claim)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘हीच का आपली संस्कृती’, ऐश्वर्याने मुलीच्या ओठांवर किस करताच भडकले नेटकरी, सोशल मीडियावर एकच खळबळ

धक्कादायक! संगीतकार किशोर ब्रिज दुबे यांचा संशयास्पदरीत्या मृत्यू, बाथरुममध्ये सापडला मृतदेह

हे देखील वाचा