‘जगातील सर्वात चांगली आई…’, म्हणत आईच्या वाढदिवशी भावुक झाली सलमानची लाडकी बहीण अर्पिता


बॉलिवूडमधील अभिनेता सलमान खान (Salman Khan)ची आई सलमा खान (Salma Khan) यांचा वाढदिवस ९ डिसेंबरला असतो, पण त्यांची मुलगी अर्पिता खान शर्मा (Arpita Khan Sharma)हिने एक दिवस आधीच आईला खास प्रकारे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अर्पिताने आईच्या वाढदिवसाच्या निमित्त सोशल मीडियावर एक सुंदर फोटो शेअर केला आहे. अर्पिताने हा फोटो बुधवारी (८ डिसेंबर) सकाळी शेअर केला आहे. या फोटोमध्ये अर्पिता, तिचा पती आयुष शर्मा(Aayush Sharma), आई सलमा खान आणि तिची दोन मुले देखील दिसत आहे.

अर्पिताने आईला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
अर्पिता खान शर्माने हा फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या फोटोसोबत तिने खूप सुंदर कॅप्शन देखील लिहिले आहे. अर्पिता आपल्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना लिहिते की, “माझी पहिली मैत्रीण, माझी सर्वात चांगली मैत्रीण आहेस तू आणि नेहमीसाठी माझी मैत्रीण असणार आहे. मला तुझ्यासोबत भांडायला खूप आवडते. आणि तुझ्या आजूबाजूला राहायला देखील आवडते, मला तुझ्या सोबत बोलायला खूप आवडते. आम्ही सर्वजण तुमच्यावर खूप प्रेम करतो. तू माझ्या आयुष्यात आहेस यासाठी मी स्वतःला खूप भाग्यशाली मानते. जगातील सर्वात चांगली आई आहेस तू, आई तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.”

अर्पिता खानने ही पोस्ट शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टवर तिच्या चाहत्यांसोबत अनेक सेलिब्रिटींनी सलमा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सलीम खान यांची पहिली पत्नी आहेत सलमा खान
सलमा खान बॉलिवूडमधील प्रसिद्ध लेखक सलीम खान (Salim Khan) यांची पहिली पत्नी आहेत. सलमा खान यांचा जन्म ९ डिसेंबर, १९४६ साली झाला होता. त्यांचे खरे नाव सुशीला चरक आहे. लग्नानंतर त्यांनी त्यांचे नाव सलमा खान ठेवले. सलमा आणि सलीम यांचा मुलगा सलमान खान (Salman Khan) बॉलिवूड सुपरस्टार आहे, आणि अरबाज खान (Arbaaz Khan)आणि सोहेल खान (Sohail Khan) हे अभिनेते असून दिग्दर्शक देखील आहेत. तसेच, त्यांना दोन मुली देखील आहेत अलविरा (Alveera khan) आणि अर्पिता खान. (Arpita Khan)

सलीम खान यांनी दत्तक घेतलेली मुलगी आहे अर्पिता
अर्पिता खान हिच्याबद्दल सांगायचं झालं, तर तिला सलीम खान यांनी दत्तक घेतले आहे. असे म्हटले जाते की, सलीम खान यांनी तिला तेव्हा दत्तक घेतलं होतं, जेव्हा अर्पिताच्या खऱ्या आईचा मृत्यू मुंबईतील रस्त्यावर झाला होता. अर्पिता तिच्या आईच्या मृतदेहा पाशी रडत बसली होती. त्यावेळी सलीम खान त्यांचे लक्ष अर्पिताकडे गेले. त्यावेळेस त्यांनी ठरवले की, हिला दत्तक घ्यायचं. अर्पिता आज खान कुटुंबातील लाडकी मुलगी आहे. तिचं लग्न अभिनेता आयुष शर्मा याच्यासोबत झाले. आणि त्यांना आता दोन मुले देखील आहेत.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!