सलीम खान आणि जावेद अख्तर यांच्यावर बनणार डॉक्युमेंट्री; त्यांच्या मुलांच्याच हाती निर्मितीची धुरा


बॉलिवूडमध्ये अनेक व्यक्तींवर डॉक्युमेंट्री बनत असते. बॉलिवूडमध्ये आता प्रेम कहाणी नाही तर इतर गोष्टी केंद्रस्थानी ठेवून चित्रपट बनवण्यावर भर दिला जाच आहे. अशातच माहिती समोर आली आहे की, बॉलिवूड मधील दबंग खान सलमान खानचे वडील सलीम खान आणि फहरान अख्तरचे वडील जावेद अख्तर यांच्यावर एक डॉक्युमेंट्री बनणार आहे. या दोघानींही ७० च्या दशकात अनेक सुपरहिट चित्रपटांची कहाणी आणि स्क्रीन प्ले लिहिले आहेत. त्यामुळे आता जर यांच्यावर एखादी डॉक्युमेंट्री बनली तर ती पाहायला खूपच मजेदार असेल यात काहीच शंका नाही.

या डॉक्युमेंट्री मधील सर्वात खास गोष्ट म्हणजे ती इतर कोणी नाही तर जावेद अख्तर आणि सलीम खान यांची मुलं मिळून करणार आहे. या चित्रपटाचे निर्माते सलमान खान, फहरान अख्तर आणि जोया अख्तर असणार आहे. आता लवकरच सलमान खान फिल्म एक्सेल एंटरटेनमेंट आणि टायगर बेबी फिल्म्स सोबत मिळून या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. या डॉक्युमेंट्रीचे नाव ‘अँग्री यंग मॅन’ हे असणार आहे. (salman khanfahran akhtar and joya akhtar make a documentry on salim khan and javed akhtar)

या डॉक्युमेंट्रीचे दिग्दर्शक नम्रता राव असणार आहे. या गोष्टीची माहिती तरुण आदर्श यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंट वरून दिली आहे. माध्यमातील वृत्तानुसार, सलीम खान आणि जावेद अख्तर यांचा चित्रपट सृष्टीतील एकत्र प्रवास या डॉक्युमेंट्रीमध्ये दाखवला जाणार आहे. त्यामुळे आता प्रेक्षक त्यांची डॉक्युमेंट्री बघण्यासाठी खूप उत्सुक आहेत. त्यांनी ‘शोले’, ‘क्रांती’, ‘डॉन’, ‘मिस्टर इंडिया’, ‘सीता और गीता’, ‘जंजीर’ आणि ‘यादों की बारात’ यासारख्या चित्रपटासाठी एकत्र काम केले आहे. त्या दोघांचाही चित्रपट सृष्टीतील प्रवास खूप सुंदर होता. तो आता संपूर्ण प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्यांच्या साठी यापेक्षाही अधिक आनंदाची गोष्ट म्हणजे ही डॉक्युमेंट्री त्यांची मुलं करणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘अभिनेता बनण्यासाठी आलोय, पॉर्नस्टार नाही’, इंटिमेट सीनवर ‘बिग बॉस’ फेम पारस छाबडाचे वक्तव्य

-‘आई नक्कीच खुश होईल’, म्हणत जेमी लिव्हरने केले लेहंग्यातील ग्लॅमरस फोटो शेअर

-मराठमोळ्या पर्ण पेठेच्या दिलखेचक फोटोची चाहत्यांना भुरळ; एक नजर टाकाच


Leave A Reply

Your email address will not be published.