मराठमोळ्या पर्ण पेठेच्या दिलखेचक फोटोची चाहत्यांना भुरळ; एक नजर टाकाच


‘विहीर’, ‘रमा माधव’ या चित्रपटात काम करून, अभिनेत्री पर्ण पेठेने चाहत्यांच्या मनात घर केलं. बऱ्याच चित्रपटात झळकलेली मराठमोळी पर्ण अभिनयासोबतच तिच्या फॅशन सेन्ससाठी देखील ओळखली जाते. सतत आपले फोटोशूट सोशल मीडियावर शेअर करून, ती चाहत्यांना पुरते घायाळ करून सोडते. नेटकऱ्यांना देखील तिचा अनोखा फॅशन सेन्स दरवेळी भावतो. आता पुन्हा तिचा एक फोटो रसिकांच्या पसंतीस उतरला आहे.

हा फोटो पर्णने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. ज्यामध्ये तिचा स्टायलिश अंदाज पाहायला मिळाला आहे. या फोटोमध्ये तिने काळ्या रंगाच्या हाफ स्लीव ब्लाउज सोबत, त्याला साजेसा लेहंगा घातलेला पाहायला मिळत आहे. सोबत तिने मांगटिका आणि नाकात नथणी घालून तिचा हा स्टायलिश लूक पूर्ण केला आहे.

फोटो शेअर करून, तिने हा फोटो थ्रोबॅक असल्याचेही सांगितले आहे. नेहमीप्रमाणे बघता बघताच हा फोटो व्हायरल झाला आणि यावर लाईक्सचा पाऊस पडू लागला आहे. तिच्या इतर फोटोंप्रमाणे यावर देखील चाहते त्यांचे प्रेम व्यक्त करत आहेत. विशेष म्हणजे, तिचा स्टायलिश लूक चाहत्यांसमोर सादर करण्याची ही पहिलीच वेळ नाही. तर यापूर्वीही तिचे बरेच फोटोशूट व्हायरल झाले होते. (marathi actress parna pethe shared her most stylish throwback photo take a look)

पर्णच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर तिने २००७ साली ‘विहीर’ चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. त्यानंतर तिने ‘रमा माधव’, ‘व्हाय झेड’, ‘फोटोकॉपी’, ‘बघतोस काय मुजरा कर अशा चित्रपटात काम करून आपली ओळख निर्माण केली. आगामी काळात अभिनेत्री मोहित टाकळकर दिग्दर्शित ‘मीडियम स्पाइसी’मध्ये झळकणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अभिनेता करण कुंद्राची एक्स गर्लफ्रेंड अनुषा दांडेकरच्या बिकिनी फोटोंनी लावली सोशल मीडियावर आग

-ज्या काळात वडील समोसा विकायचे, त्या काळातील नेहा-टोनी कक्करचा स्टेजवरील फोटो होतोय व्हायरल

-व्वा! अभिनेत्री वनिता खरातने घेतली पहिली कार, फोटो शेअर करून लिहिले ‘स्वप्नपूर्ती’


Leave A Reply

Your email address will not be published.