Wednesday, July 3, 2024

HAPPY BIRTHDAY : पैसे कमावण्यासाठी समंथाने केले होते मॉडेलिंगमध्ये पदार्पण, कमाईचा आकडा हैराण करणारा

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा पुष्पा चित्रपट जितका गाजला तितकेच या चित्रपटातील ऊ अंटावा गाणेही प्रचंड लोकप्रिय ठरले. या गाण्यामुळेच अभिनेत्री समंथा रुथ प्रभूला (Samantha Ruth Prabhu) देशभरात प्रसिद्धी मिळाली. समंथाचा तडफदार डान्स आणि घायाळ करणाऱ्या अदांनी या गाण्याचे सौंदर्य आणखीनच वाढवले. त्यामुळेच दाक्षिणात्य सिने जगतातील ही प्रसिद्ध तारका सध्या यशाच्या शिखरावर आहे. मात्र सिने जगतात येण्यापूर्वी समंथाला प्रचंड संघर्ष करावा लागला होता. शुक्रवारी(28 एप्रिल) समंथाचा वाढदिवस. जाणून घेऊया समंथाच्या आयुष्यातील हे माहित नसलेले किस्से.

समंथा रुथ प्रभू ही दाक्षिणात्य सिनेजगतातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या दमदार अभिनयाने आणि घायाळ करणाऱ्या सौंदर्याने तिने चित्रपट जगतात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. समंथाचा जन्म 28 एप्रिल 1987 रोजी चेन्नईमध्ये झाला. एक सामान्य घरातील मुलगी ते सुपरस्टार होण्यापर्यंतचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. अत्यंत कठीण काळाचा सामना करत समंथाने आपली योग्यता सिद्ध केली आहे.

समंथा सध्या सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. मात्र समंथाची पहिली कमाई ऐकूण तुम्हालाही धक्का बसेल. समंथा 10वी 11वी मध्ये असताना एका हॉटेलमध्ये होस्टेस म्हणून काम करताना 500 रुपये दिले होते. हीच तिची पहीली कमाई होती. त्याचप्रमाणे समंथा सिने जगतात येण्याचाही एक मोठा किस्सा आहे. समंथा जेव्हा 20 वर्षाची होती तेव्हा तिला मोठ्या प्रमाणावर आर्थिक अडचण निर्माण झाली होती. त्यामुळेच तिने पार्ट टाईम जॉब करायला सुरूवात केली. याचवेळी तिने पैसे कमावण्यासाठी मॉडेलिंग करण्याचा निर्णय घेतला. इथूनच तिच्या अभिनय कारकिर्दिला सुरूवात झाली.

समंथाने 2010 मध्ये रवि वर्मनचा ‘मॉस्को कावेरी’ हा चित्रपट साइन केला होता, परंतु तिचा पहिला चित्रपट गौतम मेनन दिग्दर्शित ‘ये माया चेसव’ होता. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले आणि तिला त्या वर्षी फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. तेव्हापासून समंथाला मोठ्या चित्रपटांच्या ऑफर्स मिळू लागल्या. 2013 मध्ये, त्यांना तेलगू आणि तमिळ या दोन्ही भाषांमधील चित्रपटातील अभिनयासाठी फिल्मफेअर मिळाला. समंथाने आतापर्यंत तमिळ, तेलुगु, मल्याळम आणि हिंदी चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम केले आहे.

समंथाला 2012मध्ये एका आजारानेही घेरले होते. ज्यामुळे तिच्या हातून अनेक प्रकल्पही गेले होते. त्यानंतर तिने ब्रेक घेतला आणि तिच्या तब्येतीची काळजी घेतली. 2012 मध्ये आलेला ‘एक दीवाना था’ हा चित्रपट तुम्ही पाहिलाच असेल, या चित्रपटात समंथा देखील होती, हे क्वचितच माहीत असेल. या चित्रपटात समंथाची छोटीशी भूमिका होती, पण असे करून अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. याशिवाय समंथाने मनोज बाजपेयीसोबत ‘फॅमिली मॅन’ या वेब सीरिजद्वारे ओटीटीमध्ये पदार्पण केले. यामध्ये ती राणीच्या भूमिकेत दिसत होती. यामधील तिच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले होते.

समंथा आणि नागा चैतन्य यांचे 2017 मध्ये लग्न झाले आणि दोघांनी 2021 मध्ये वेगळे होण्याची घोषणा केली. आता दोघांचा घटस्फोट झाला आहे. अशा परिस्थितीत, हा काळ तिच्यासाठी खूप कठीण होता, परंतु आता तिने पुन्हा तिच्या कामावर लक्ष केंद्रित केले आहे. (samantha ruth prabhu birthday special)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
समंथा रुथ प्रभूची दहावीची मार्कशीट झाली व्हायरल, गणिताचे आकडे पाहून तुम्ही व्हाल थक्क
सोनाक्षी सिन्हा 27 मुलींच्या शोधात निघाली एकटीच, अंगावर काटा आणणारा ‘दहाड’चा ट्रेलर रिलीज

हे देखील वाचा