अभिनेत्री समीरा रेड्डीमध्ये पाहायला मिळाले जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन; म्हणाली, ‘अजून लक्ष्य पूर्ण झाले नाहीये’


या ग्लॅमर क्षेत्रात तुम्हाला सतत फिट आणि सुंदर दिसावेच लागते. जरी तुम्ही चित्रपटांमधून काही काळ ब्रेक घेतला असला तरी फिट आणि सुंदर दिसणे आवश्यकच असते. वजन वाढीचे, सुंदरता कमी होण्याचे किंवा ग्लॅमर्स न दिसण्याचे कारण कोणतेही असले, तरी कमीतकमी सोशल मीडियावर किंवा सार्वजनिक ठिकाणी हजेरी लावताना तुम्हाला या इंडस्ट्रीला सूट होईल असे दिसणे भागच असते. यासाठी कोणतेही कारण चालत नाही. हा नियम विशेषतः अभिनेत्रींसाठी मोठ्या प्रमाणवर लागू होतो.

हिंदी सिनेमांमधील अभिनेत्री समीरा रेड्डी सर्वांना आठवतच असेल. काही महिन्यांपूर्वी जेव्हा समीराने तिचे फोटो सोशल मीडियावर टाकले, तेव्हा तिला वजनावरून मोठ्या प्रमाणात ट्रोल केले गेले. त्यानंतर समीराने वजन कमी करण्यास सुरुवात केली. समीराने नुकतेच तिचे दोन फोटो सोशल मीडियावर पसोट केले असून, यातील दुसऱ्या फोटोमध्ये ती कमालीची फिट दिसत आहे.

हे फोटो पोस्ट करताना समीराने लिहिले, “कधी कधी फोटो आपल्याला धोका सुद्धा देतात. मी फिटनेस फ्रायडेच्या निमित्ताने स्वतःलाच आठवण करून देत आहे की, मला जे पाहिजे आहे ते मी अजून मिळवले नाही. मी न चुकता व्यायाम करत आहे आणि मला त्याचा रिजल्ट देखील दिसत आहे. पण अजूनही माझ्याकडे पोटावरची आणि इतर अतिरिक्त चरबी आहे. जी लवकरच निघून जाईल. जेव्हा मी काही फोटो बघते तेव्हा खूप प्रेरित होते आणि हेच माझे फिटनेसचे मोटिव्हेशन आहे. तर मुद्दा हा आहे की, माझा हा आठवडा खूपच चांगला गेला. माझे काही इंचेस कमी झाले आहेत हे फक्त साखरेवर बंधन, इंटरमिटेंट फास्टिंग, आठवड्यातून चार वेळा योगा आणि बॅडमिंटन याचमुळे आहे. आशा करते की, मी माझा फिटनेस असाच सुरु ठेवेल. मी दिवाळीपर्यंत माझे उद्देश पूर्ण करेल असे टार्गेट ठेवले आहे.” समीराने पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये तिच्या वजनात पडलेला फरक अगदी सहज आपण पाहू शकतो.

‘मैने दिल तुझको दिया’ सिनेमातून अभिनयाच्या सृष्टीत पदार्पण करणाऱ्या समीराने अनेक सिनेमात चांगल्या भूमिका साकारल्या. २०१४ साली समीराने उद्योगपती अक्षय वार्डेसोबत महाराष्ट्रीयन पद्धतीने लग्न केले. समीराचे लग्न झाल्यानंतर समीराने चित्रपटांमधून ब्रेक घेतला आणि तिच्या व्यक्तिमत्वात बदल होण्यास सुरुवात झाली. समीरा जेव्हा लग्नानंतर प्रेग्नेंट होती तेव्हा तिचे वजन वाढून १०५ किलो झाले. तिला तिच्या वजनाचे खूप टेन्शन यायचे मात्र तिला सर्वांनी सांगितले होते की, बाळ खूप हेल्दी आहे. पण तरीही तिला टेन्शन यायचे. तिच्या डिलिव्हरीनंतर तिला ‘एलोपेसिया एरियाटा’ हा आजार झाला. यामुळे तिचे केस गळण्यास सुरुवात झाली. त्यानंतर तिने डॉक्टरांची ट्रीटमेंट घेण्यास सुरुवात केली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मैं तो खड़ी थी आस लगाए…’, रितिका श्रोत्रीच्या निरागसतेने नेटकऱ्यांना पाडली भुरळ

-कंगना रणौत करणार इंदिरा गांधींवर आधारित चित्रपटाचे दिग्दर्शन; म्हणाली, ‘माझ्यापेक्षा इतर कोणीही…’

-सुरेश रैनाला बॉलिवूड कलाकार आवडत नाहीत? आपल्या बायोपिकसाठी या दोन साऊथ कलाकारांची सुचवली त्याने नावे


Leave A Reply

Your email address will not be published.