बॉलिवूडच्या दिग्गज दिग्दर्शकांचा उल्लेख होतो, तेव्हा संजय लीला भन्साळी हे नाव नेहमीच वर असते. त्यांच्या करीअरमध्ये त्यांनी बॉलिवूडला एका पेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्यामुळे त्यांचे चित्रपट सगळयांना खूप आवडत असतात. अशातच शुक्रवार (२४फेब्रुवारी) रोजी ते त्यांचा वाढदिवस साजरा करत आहेत. चला तर मग जाणून घेऊया त्याच्याबाबत काही खास माहिती.
संजय लीला भन्साळी (sanjay leela bhansali) यांचा जन्म २४ फेब्रुवारी १९६४ मध्ये मुंबई येथे झाला. त्यांनी ‘हम दिल दे चुके सनम’, ‘देवदास’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘पद्मावत’ आणि ‘रामलीला’ यांसारखे अनेक अजरामर चित्रपट बनवले आहे. मागच्या वर्षी त्यांचा ‘गंगुबाई काठीयावाडी’ हा चित्रपट देखील प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात आलिया भट्ट मुख्य भूमिकेत होती. हा चित्रपट संजय लीला भन्साळी यांच्या अगदी जवळचा आहे. या चित्रपटाला त्यांनी ‘ड्रीम प्रोजेक्ट’ करार दिला होता.
भन्साळी बॉलिवूडमध्ये एक मल्टीस्टारर मानले जातात. ते चित्रपट दिग्दर्शक होण्यासोबतच निर्माते, संगीत दिग्दर्शक आणि स्क्रिप्ट रायटर देखील आहेत. त्यांना लहानपणापासूनच चित्रपटसृष्टीत नाव कमवायचे होते. म्हणून त्यांनी त्यांचे शिक्षण पुण्यामधील फिल्म अँड टेलिव्हिजन ऑफ इंडियामधून पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी एडिटिंगचा कोर्स केला. एफटीआयआयमधून चित्रपट निर्मितीचा कोर्स केल्यानंतर संजय लीला भन्साळी यांनी दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांच्यसोबत काम करण्यास सुरुवात केली. त्यांनी १९९६ मध्ये ‘खामोशी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले. हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधी त्यांनी ‘परिंदा’ आणि ‘ए लव्ह स्टोरी’ या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे.
संजय लीला भन्साळी यांनी त्यांच्या आयुष्यात आर्थिक तंगीचा सामना केला आहे. माध्यमातील वृत्तानुसार ते लोकांकडे पैसे मागत असत. या सगळ्याचे कारण होते ते त्यांचे वडील. ते देखील चित्रपट निर्माते होते. परंतु करीअरमध्ये सफलता न मिळाल्याने ते पूर्णपणे दारूच्या नशेत बुडाले होते. त्यांना कुटुंबाला सांभाळायचे देखील भान राहिले नव्हते. अशातच संजय लीला भन्साळी यांनी यांच्या आईने संपूर्ण घराची जबाबदारी घेतली. त्या स्टेजवर जाऊन परफॉर्म करायच्या आणि जेवढे पैसे मिळतील त्यातून घर चालवायच्या. तसेच लोकांचे कपडे शिवून देऊन मुलांना सांभाळत होत्या. त्यांच्या आईने आयुष्यात खूप संघर्ष केला आहे. याच कारणामुळे ते त्यांच्या आईचे नाव त्यांच्या नावा समोर लावतात.
सलमान खान, अजय देवगण आणि ऐश्वर्या राय यांचा १९९९ मध्ये आलेला ‘हम दिल दे चुके सनम’ हा चित्रपट असा पहिला चित्रपट होता ज्यात संजय लीला भन्साळी हे निर्माते, दिग्दर्शक आणि लेखक होते. या चित्रपटाने सर्वत्र धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाल त्यांच्या करीअरमधील गेम चेंजर चित्रपट देखील म्हटले जाते. या चित्रपटाच्या यशानंतर त्यांचे नाव बॉलिवूडमधील दिग्गज दिग्दर्शकांच्या यादीत आले. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. यानंतर त्यांचे अनेक सुपरहिट चित्रपट प्रदर्शित झाले. त्यांनी त्यांच्या करीअरमध्ये एका पेक्षा एक सुपरहिट चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्यांचे काही चित्रपट वादात देखील राहिले आहेत. परंतु वादात अडकल्यानंतर देखील त्यांना खूप यश मिळाले.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीने सोशल मीडियाला अचानक ठोकला रामराम, पोस्ट शेअर करत दिली माहिती
अत्यंत वादग्रस्त : ‘स्वरा भास्कर जर हजारो पुरुषांसोबत रात्र घालवणार…’, अयोद्धेतील महंताच्या विधानाने खळबळ