संजय लीला भन्साळी आणि सलमान खान यांचा ‘इंशाल्लाह’ चित्रपट ‘या’ दोन अभिनेत्रींमुळे गेला डब्यात


बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी ‘हम दिल दे चुके सनम’ नंतर ‘इंशाल्लाह’ नावाच्या चित्रपटाची घोषणा केली होती. ज्यामध्ये आलिया भट्ट देखील होती. सलमान आणि आलियाच्या या मेगा-बजेट चित्रपटाची घोषणा जितक्या जोरात झाली, तितक्याच जोरात हा बंदही झाला. सलमान आणि संजय लीला भन्साळी यांच्यातील मतभेदामुळे हा चित्रपट कधीच फ्लोअरवर जाऊ शकला नाही, ज्यामुळे मीडियामध्ये अनेक बातम्या आल्या. सलमान आणि संजय लीला भन्साळी यांनी या वादावर कधीही मौन सोडले नाही आणि त्यांच्या आगामी प्रोजेक्टमध्ये व्यस्त झाले.

‘इंशाल्लाह’ बंद का झाला, हा आजही मोठा प्रश्न आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, सलमानने (Salman Khan) दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्यासमोर अशा दोन अटी ठेवल्या होत्या. ज्यामुळे चित्रपट कधीच फ्लोरवर जाऊ शकत नाही. माध्यमांतील वृत्तामध्ये असे सांगण्यात आले आहे की, सलमानने संजय लीला भन्साळी यांना चित्रपटात सुष्मिता सेनचा (Sushmita Sen) स्पेशल डान्स नंबर घ्यायला सांगितला होता आणि अभिनेत्री डेझी शाहचा कॅमिओ करावा, अशी अटही ठेवली होती.

sanjay leela bhansali

संजय लीला भन्साळी यांना सलमानच्या या दोन्ही अटी आवडल्या नाहीत आणि त्यांनी शेवटी चित्रपट स्थगित करण्याचा निर्णय घेतला. भन्साळी चित्रपट बनवताना कोणाचेही ऐकत नाहीत. सलमान चित्रपटात सुरुवातीपासूनच ढवळाढवळ करत असेल, तर नंतर हा हस्तक्षेप आणखी वाढेल, असे भन्साळी यांना वाटत होते.

‘इंशाल्लाह’ चित्रपट बंद केल्यानंतर, संजय लीला भन्साळी यांनी आलिया भट्टसोबत ‘गंगूबाई काठियावाडी’ सुरू केला, जो २०२२ मध्ये प्रदर्शित होणार आहे. आलियाने या चित्रपटात एका वेश्येची भूमिका साकारली होती. जिने तिच्यासारख्या महिलांसाठी लढा दिला आणि खूप प्रसिद्धी मिळवली.

alia and salman

सलमानचा नुकताच ‘अंतिम’ हा बहुप्रतीक्षित सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमाला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आणि सलमानच्या भूमिकेची खूप कौतुक झाले. आता सलमान त्याच्या आगामी ‘टायगर 3’ सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

हेही वाचा :


Latest Post

error: Content is protected !!